Nojoto: Largest Storytelling Platform

शीर्षक : या क्रांती सूर्याचे उपकार महात्मा फुलेंच

शीर्षक : या क्रांती सूर्याचे उपकार

महात्मा फुलेंचे कार्य असे हे थोर 
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

घरच्याच चौकटीत चार भिंती
चुलमुलं बंदिस्त जीवन सारे 
हुंदक्यांचा तो आवाज बंद 
मुलींसाठी किती पहारे 
तोडले पहारे, या क्रांतीसुर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

बंद केली सती प्रथा 
सती प्रथेला घातला आळा 
नवजीवन दिले तिजला
वाचविले तिच्या तान्ह्या बाळा
नवजीवन दिले आम्हा, या क्रांती सूर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

वाचविण्या जगाचा पोशिंदा 
घेतला आसूड हाती 
गुलामगिरी संपविण्या 
तळपला तो क्रांतीसुर्य ज्योती 
झुगारिली अमानुष प्रथा, या क्रांती सूर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

घेऊनी संगे सावित्रीला 
तिलाही ज्ञानाचा धडा शिकविला 
मिळुनी मग दोघा उभयंत्यांनी   
शिक्षणाचा विडा उचलला 
बहुजना शिकविले, या क्रांती सूर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

ज्योती किरतकुडवे (साबळे) 
दिवा - ठाणे

©Jk क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏
शीर्षक : या क्रांती सूर्याचे उपकार

महात्मा फुलेंचे कार्य असे हे थोर 
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

घरच्याच चौकटीत चार भिंती
चुलमुलं बंदिस्त जीवन सारे 
हुंदक्यांचा तो आवाज बंद 
मुलींसाठी किती पहारे 
तोडले पहारे, या क्रांतीसुर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

बंद केली सती प्रथा 
सती प्रथेला घातला आळा 
नवजीवन दिले तिजला
वाचविले तिच्या तान्ह्या बाळा
नवजीवन दिले आम्हा, या क्रांती सूर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

वाचविण्या जगाचा पोशिंदा 
घेतला आसूड हाती 
गुलामगिरी संपविण्या 
तळपला तो क्रांतीसुर्य ज्योती 
झुगारिली अमानुष प्रथा, या क्रांती सूर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

घेऊनी संगे सावित्रीला 
तिलाही ज्ञानाचा धडा शिकविला 
मिळुनी मग दोघा उभयंत्यांनी   
शिक्षणाचा विडा उचलला 
बहुजना शिकविले, या क्रांती सूर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

ज्योती किरतकुडवे (साबळे) 
दिवा - ठाणे

©Jk क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏
jyotikiratkudve6114

Jk

Bronze Star
New Creator