Nojoto: Largest Storytelling Platform

कविता म्हणजे काय..?? जेव्हा जवळ कुणी नसतं तेव्हा

कविता म्हणजे काय..??

जेव्हा जवळ कुणी नसतं
तेव्हा साथ देते ती तुझ्या आठवणींचे
धागे असलेली गुंफण म्हणजे कविता..
माझी सगळी दु:ख ज्याच्यात विरून
जातात
ती तुझ्या अस्तित्वाची सुरेल तान म्हणजे कविता..
आयुष्याचा जुना अर्थ नव्यानं तुझ्या
आकाररूपी सरीतेमुळे
पुन्हा समजला
ती सरीता म्हणजे कविता..
माझ्या भावनांचा बांध जिथे
फुटतो ती तुझ्या चाहुलीची
रिमझीम बरसणाररी पाऊसधार म्हणजे कविता..
माझ्या स्वप्नाच्या दुनियेतली दुःखाची लय
तुझ्या ज्या पाऊलखुणांवर संपून
पुन्हा नव्यानं सुरू होते
ती पाऊलखुणांची रास म्हणजे कविता..
माझ्या श्वासाला बाहेर पडायला मार्ग देते
ती तुझी ध्यासरूपी माळ
म्हणजेच
कविता..

©शब्दवेडा किशोर #माझी_लेखणी
कविता म्हणजे काय..??

जेव्हा जवळ कुणी नसतं
तेव्हा साथ देते ती तुझ्या आठवणींचे
धागे असलेली गुंफण म्हणजे कविता..
माझी सगळी दु:ख ज्याच्यात विरून
जातात
ती तुझ्या अस्तित्वाची सुरेल तान म्हणजे कविता..
आयुष्याचा जुना अर्थ नव्यानं तुझ्या
आकाररूपी सरीतेमुळे
पुन्हा समजला
ती सरीता म्हणजे कविता..
माझ्या भावनांचा बांध जिथे
फुटतो ती तुझ्या चाहुलीची
रिमझीम बरसणाररी पाऊसधार म्हणजे कविता..
माझ्या स्वप्नाच्या दुनियेतली दुःखाची लय
तुझ्या ज्या पाऊलखुणांवर संपून
पुन्हा नव्यानं सुरू होते
ती पाऊलखुणांची रास म्हणजे कविता..
माझ्या श्वासाला बाहेर पडायला मार्ग देते
ती तुझी ध्यासरूपी माळ
म्हणजेच
कविता..

©शब्दवेडा किशोर #माझी_लेखणी