Nojoto: Largest Storytelling Platform

घरट्याकडे वळा. भिमबाच्या लेकरांनो,भिमबाच्या पाखरा

घरट्याकडे वळा.

भिमबाच्या लेकरांनो,भिमबाच्या पाखरांनो
घरट्याकडे वळा रे, घरट्याकडे वळा.

घर बा भिमाचं माझ्या ,आता पोखरू नका रे
या छत्र छायेखाली घ्या श्वास मोकळा.

बेकीचं राजकारण सोसलं पिढ्यापिढ्यांनी
संघटित होण्या आता तू भेट घे गळा.

खांद्यावरी मिरवले कोनाकोणाचे झेंडे
तडफडतो फडफडतो निशाण हा निळा.

दिला बा भिमानं माझ्या तथागताचा धम्म
बुद्धाच्या धम्माचा रे तुला लागू दे लळा.

भिमबाच्या लेकरांनो,भिमबाच्या पाखरांनो
घरट्याकडे वळा रे, घरट्याकडे वळा.

                             ------भिमराव तांबे.
                                  #घरट्याकडे वळा.
घरट्याकडे वळा.

भिमबाच्या लेकरांनो,भिमबाच्या पाखरांनो
घरट्याकडे वळा रे, घरट्याकडे वळा.

घर बा भिमाचं माझ्या ,आता पोखरू नका रे
या छत्र छायेखाली घ्या श्वास मोकळा.

बेकीचं राजकारण सोसलं पिढ्यापिढ्यांनी
संघटित होण्या आता तू भेट घे गळा.

खांद्यावरी मिरवले कोनाकोणाचे झेंडे
तडफडतो फडफडतो निशाण हा निळा.

दिला बा भिमानं माझ्या तथागताचा धम्म
बुद्धाच्या धम्माचा रे तुला लागू दे लळा.

भिमबाच्या लेकरांनो,भिमबाच्या पाखरांनो
घरट्याकडे वळा रे, घरट्याकडे वळा.

                             ------भिमराव तांबे.
                                  #घरट्याकडे वळा.