Nojoto: Largest Storytelling Platform

White #कारण..कुंपणच मला परकं झालं.... शब्दवेडा किश

White #कारण..कुंपणच मला परकं झालं....
शब्दवेडा किशोर 
जन्मा आले आईबापाच्या घरी व झाले सौभाग्यवती आयुष्य माझे विसरून गेली
अन् कुळाचे नाव भूषविले जाऊनी मी सासरी 
कारण..कुंपणच मला परकं झालं....
अनेक साल जन्माघरच्या उंबऱ्यावर खूप लाडात खेळली,रमली अन् वाढली मी 
पण एक दिवस अनाहूतपणे मला सासरी पाठवून माझी नाळ परक्या घराशी
माझ्याच रक्ताच्या लोकांनी बांधली
कारण..कुंपणच मला परकं झालं....
माहेर अन् सासर दोन्ही घरांना मी कायम माया दिली तरीही स्त्री जन्माच्या रीतीनुसार दोन्हीही घरात माझी जागा मात्र कायमच दुय्यम राहिली
कारण..कुंपणच मला परकं झालं....
नवलौकीनी नवयौवना जणू बेजोड नक्षत्रासम एक असलेली चंद्रलतिका मी
कुठं व्यसनाधिनतेच्या सौद्यात तर कुठं पैशाच्या नात्यात बांधली गेली मी 
तरीही कुठलीच तक्रार न करता हे मज नियतीकडून मिळालेलं व अर्धशापित
असलेलं हे सौभाग्यलेणं लेवूनिया मी सदा हसतच आयुष्य जगत राहीली
कारण..कुंपणच मला परकं झालं....
मी जिथं जिथं बांधली गेली तिथं तिथं संसाराचा रथ मोठ्या धीरानं मी सदा ओढला 
माझ्या रथाला बांधल्या गेलेल्या बऱ्याच संसारवेलींवर अनेकदा खराब नियती सोबतीस घेऊनी एक सुंदर कळी उमलली पण व्यसनाधीनतेत लीन असलेल्या बापाने अन् भावनेही तिला नासवून संपवलं तर कुठं पैशाच्या बाजारात स्वतः वाया जाऊन तीनेच स्वतःची काया विकली व खूप ठिकाणी तर माझ्याकडून झालेल्या
अथक प्रयत्नांनी तिला जीवदानही भेटलं मात्र ते भेटुनही पुढं माझ्यासम तिचंही आयुष्य विविध शापांचे डाग असलेलं बनलं 
कारण....
कुंपणच मला परकं झालं......

©शब्दवेडा किशोर #स्त्री