White आज कितीतरी दिवसांनी लिहायला घेतलं.. मोबाईलच्या कीपॅडवर अक्षरं शोधणारी बोटं बघून आश्चर्य वाटलं. मनाच्या तळाशी साचलेलं बरंच काही आहे जे बाहेर येण्यासाठी तळमळतंय पण त्याला बाहेर काढताना शब्दांना धाप लागतेय. कर्ता,कर्म, क्रियापद, विशेषणं...कुणीच हाताला सापडत नाहीयेत. काय करू ? काहीच कळत नाहीये.... मौनाच्या राज्यात बसून राहिले तर हरवून जाईन कुठेतरी. काहीही करून या शब्दांना खेचून आणले पाहिजे. त्यांच्या तब्येतीला झेपतील एवढ्या ओळी तर लिहिल्याच पाहिजेत, नाही का ? साचलेलं मोकळं केलंच पाहिजे.......... ✍️ निलम ©Nilam Buchade पुन्हा लिहितेय... #माझीलेखणी poetry quotes sad poetry poetry