Nojoto: Largest Storytelling Platform

कवीने मरून जावं खोटं खोटं त्याला हवी तशी हवी तितक

कवीने मरून जावं खोटं खोटं 
त्याला हवी तशी
हवी तितकी
 प्रामाणिक
खरी 
वास्तववादी
तद्नंत बाजारू
काल्पनिक 
कविता लिहून....

कवीने  मरून जावं
खरंखुरं
खरी खुरी
प्रामाणिक
वास्तववादी
कविता लिहिण्यासाठी...

कवीने जगूच नये जगण्यासाठी
कवीने जगावं कवितेसाठी
कवीने कविता जगावी
कवितेने कवीला जगवावं
आणि मग कविता मरणार नाही
पर्यायाने कवी मरणार नाही

सगळं जगत राहील
उजळत राहील...
प्रकाशमान होईल
प्रकाशून जाईल
समाधी घेतल्या नंतर ही जिवंत राहणाऱ्या ज्ञाना सारखं
तरंगणाऱ्या तुकोबांच्या गाथे सारखं
क्रूसावर चढवूनही चालत्या फिरत्या माणसातल्या यशू सारखं

कवीने जगावं
कधीच जन्माला न आल्या सारखं
आणि मरूनही न मेल्या सारखं

-# shree after long time
कवीने मरून जावं खोटं खोटं 
त्याला हवी तशी
हवी तितकी
 प्रामाणिक
खरी 
वास्तववादी
तद्नंत बाजारू
काल्पनिक 
कविता लिहून....

कवीने  मरून जावं
खरंखुरं
खरी खुरी
प्रामाणिक
वास्तववादी
कविता लिहिण्यासाठी...

कवीने जगूच नये जगण्यासाठी
कवीने जगावं कवितेसाठी
कवीने कविता जगावी
कवितेने कवीला जगवावं
आणि मग कविता मरणार नाही
पर्यायाने कवी मरणार नाही

सगळं जगत राहील
उजळत राहील...
प्रकाशमान होईल
प्रकाशून जाईल
समाधी घेतल्या नंतर ही जिवंत राहणाऱ्या ज्ञाना सारखं
तरंगणाऱ्या तुकोबांच्या गाथे सारखं
क्रूसावर चढवूनही चालत्या फिरत्या माणसातल्या यशू सारखं

कवीने जगावं
कधीच जन्माला न आल्या सारखं
आणि मरूनही न मेल्या सारखं

-# shree after long time
shree0077091

shree 007

New Creator

after long time #poem