Nojoto: Largest Storytelling Platform

°मायबोली माझी मराठी ° मायबोली माझी मराठी फुलविल

°मायबोली माझी मराठी ° 

मायबोली माझी मराठी 
फुलविली तुका जनाईंनी 
अमृताते पैजा जिंकी 
ज्ञानदेवांच्या ओवींनी 
  ज्ञान माउली सांगतसे 
  मराठीत गीता सार 
  एकनाथ गायी भारुड 
  चोखामेळा करी जोहार 
वृक्षवल्ली हे सोयरे 
सांगुनिया तुका गेले 
दासबोध श्लोक मनाचे
रामदासी घडविले 
  बहिणाई सांगे माझी 
  या संसाराचे सारासार 
  जनाबाई गात ओवी 
  दळण दळीत भारभार 
मुक्ताबाई नामदेव 
एकनाथ सावतामाळी 
गाडगे बाबा नरहरी 
सारी संतांची मांदियाळी 
  अशी माझी माय मराठी 
  सज्जनांनी रुजविली 
  श्रींची ईच्छा शिरसावंद्य 
  शिवरायांनी वाढविली 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav •••महाराष्ट्रातील सर्व संतांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजाश्रय दिला.  त्याचे वर्णन या "मायबोली माझी मराठी" या कवितेतून मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
°मायबोली माझी मराठी ° 

मायबोली माझी मराठी 
फुलविली तुका जनाईंनी 
अमृताते पैजा जिंकी 
ज्ञानदेवांच्या ओवींनी 
  ज्ञान माउली सांगतसे 
  मराठीत गीता सार 
  एकनाथ गायी भारुड 
  चोखामेळा करी जोहार 
वृक्षवल्ली हे सोयरे 
सांगुनिया तुका गेले 
दासबोध श्लोक मनाचे
रामदासी घडविले 
  बहिणाई सांगे माझी 
  या संसाराचे सारासार 
  जनाबाई गात ओवी 
  दळण दळीत भारभार 
मुक्ताबाई नामदेव 
एकनाथ सावतामाळी 
गाडगे बाबा नरहरी 
सारी संतांची मांदियाळी 
  अशी माझी माय मराठी 
  सज्जनांनी रुजविली 
  श्रींची ईच्छा शिरसावंद्य 
  शिवरायांनी वाढविली 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav •••महाराष्ट्रातील सर्व संतांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजाश्रय दिला.  त्याचे वर्णन या "मायबोली माझी मराठी" या कवितेतून मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
devanandjadhav3540

Devanand Jadhav

New Creator
streak icon20

•••महाराष्ट्रातील सर्व संतांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजाश्रय दिला. त्याचे वर्णन या "मायबोली माझी मराठी" या कवितेतून मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. #मराठीकविता