घाव ! Author_Dharmendra Gopatwar आता कुठे हिरव्या देशाचा जन्म झाला होता , नुकतेच मान्यता मिळाली होती ! पहिल्याच श्वासात रक्तपात झाला.... पुजीला मी ज्या रामाला त्याची दहा तोंडे झाली जमिनीच्या पोटात आता कुठे सोन पेरल होत रावणाने अतिवृष्टीच्या च्या रुपात उल्कापात केला ..... बघता बघता कसा हा खेळ झाला मिठाने भरणारा घाव झाला हिरव्या रानाच्या आस मागता काळाने हिरव्या देशाचा वाळवंट केला , जीवनाचा जणू पोरखेळ झाला ... सैनिकांसारखे पिक होती उभी पालवांची ढाल घेऊन आकाशातून वर्षेच्या उल्कापात झाली बळी राजाचा महिसासुराशी युद्ध सुरू झाला कित्येक सैनिक बळी गेले सैनिक काही झाले शहीद काही अंगावर घाव घेऊन आहेत उभी ...! हिरव्या देशावर संकटांचा जणू महापूर आला. बळी राजाचे राज्यावर त्याने ताबा केला पुरू राज्याचा रावण सैन्य घेऊन पिकांवर रक्तपात करत समोर चालतच गेला बळीराजाच्या राज्यावर हा ग्रहण कुठला लागला रामाचा हार रावणाचा विजय हा युग कोणता कळेना ... रामाचां झालेला हार ..सैन्याला पचवेना , पुन्हा बळीराजाने सैन्य उभारले शंभराला सव्वासौ बराबर लढण्याचे त्या घावांने त्याला सिख देऊन गेले लढवय्ये पीक उभी आहेत , तय्यार युद्धाला ! आता .... आधी राक्षसा पासून राज्य वाचविणे हा हेतू तर आता राज्य जिंकणे एवढं धेय्य ठेवून लढायची तयारी त्याने केला आहे त्याने पावसासाठी ..रामाला कडे आस नाही केला रावणा सोबतच उल्का पिंढा शी युध्दाचे तयारी त्याने केलेला आहे रावणापसून बळीराजाच्या राज्य सोडवून , पुन्हा एकदा स्वतंत्र हिरवं राज्य उभारण्याचे धेय्य बळीराजाचे आहे ! युद्धासाठी आहेत उभी त्याची फौज ढाल घेऊन पुन्हा खंबीर ! Youtube.com/कवी मन _मनातलं ओझं पानावर ©Dharmendra Gopatwar #घाव#शेतकरी