Nojoto: Largest Storytelling Platform

#OpenPoetry असे वाटे आकाशाच्या सागरी पाहता मेघलाट

#OpenPoetry असे वाटे

आकाशाच्या सागरी पाहता मेघलाटा
होडी घेऊन जावे वाटे शोधाया वाटा

पृथ्वीपासून चंद्रापर्यंत बांधूया पूल
सूर्यावर रंगीबेरंगी पांघरूया शाल

वाटे लावू शर्यत या भव्य सागरात
तार्‍यांचे मोती घेऊन येतील हात

असे वाटे तारे वेचून काढावी नक्षी
वाटे बनावा ब्रह्मांडात फिरणारा पक्षी

असे वाटे ध्रुवासोबत खेळाया जावे
तारकांसोबत फेर धरूनी गावे नाचावे

वाजेचा चाबूक घेऊनी सूर्यरथी बसावे
ग्रहतार्‍यांच्या भेटी घेत दशदिशांत हिंडावे असे वाटे
#OpenPoetry असे वाटे

आकाशाच्या सागरी पाहता मेघलाटा
होडी घेऊन जावे वाटे शोधाया वाटा

पृथ्वीपासून चंद्रापर्यंत बांधूया पूल
सूर्यावर रंगीबेरंगी पांघरूया शाल

वाटे लावू शर्यत या भव्य सागरात
तार्‍यांचे मोती घेऊन येतील हात

असे वाटे तारे वेचून काढावी नक्षी
वाटे बनावा ब्रह्मांडात फिरणारा पक्षी

असे वाटे ध्रुवासोबत खेळाया जावे
तारकांसोबत फेर धरूनी गावे नाचावे

वाजेचा चाबूक घेऊनी सूर्यरथी बसावे
ग्रहतार्‍यांच्या भेटी घेत दशदिशांत हिंडावे असे वाटे

असे वाटे #poem #OpenPoetry