White #कारण आज देवाला सुट्टी आहे.. शब्दवेडा किशोर आज देवाला सुट्टी आहे कृपया मंदिरात जाऊ नये देव खुप बिझी आहे त्याला साकडं घालू नये जायचंच असेल तर जा एका अनाथाश्रमात तो तिथे लहान पोरांना हसवीत आहे तुम्हीही हसवा एखाद्या कोमेजलेल्या फुलाला कारण देवाला आज सुट्टी आहे.... तो दिसेल वृद्धाश्रमात आजी आजोबांचे डोळे पुसताना रुमाल घेवून जा तुम्हीही अश्रु पुसण्यासाठी मात्र आपले अश्रु दाखवु नका कारण आज देवाला सुट्टी आहे.... तो बसला आहे अन्नाच्या कणाकणात उगीच अन्न वाया घालू नका जमेल तर एखादा घास द्या भुकेल्या माणसाला तो आज त्यांच्यात रमला आहे कारण आज देवाला सुट्टी आहे.... ©शब्दवेडा किशोर #देव_माझा