Nojoto: Largest Storytelling Platform

!! ताई तूच हो सक्षम !! राखी बांधलीस तु तुझा पाठ र

!! ताई तूच हो सक्षम !!

राखी बांधलीस तु
तुझा पाठ राखणीला
भाऊराया हा तूझा
राहील का सोबतीला

जीवनाचा मार्ग
पूर्ण करायच तुला
आपल्या मनगटात 
जोर दयायच तुला

वेडी वाकडी वळण
कशाला घाबरायचं
समर्थ आहेस तूच
पुढं चालत राहायचं

कलियुगाचे राक्षस तुला
समोर जाळे टाकतील
संस्कारांच्या शिदोरीने
तूच मोकळे करशील

तु कुठेही चालताना
नजर खाली व्हावी
ताई म्हणून हाक
तुला समोरून यावी

कर्तुत्वाचे शब्द तुझे
बातमीला झळकू दे
बहिणीच महत्व हे
विश्वाला समजू दे

श्री जोतिबा आप्पाजी पाटील
मु किटवाड पो होसूर

©Jotiba ताई तूच हो सक्षम..!
!! ताई तूच हो सक्षम !!

राखी बांधलीस तु
तुझा पाठ राखणीला
भाऊराया हा तूझा
राहील का सोबतीला

जीवनाचा मार्ग
पूर्ण करायच तुला
आपल्या मनगटात 
जोर दयायच तुला

वेडी वाकडी वळण
कशाला घाबरायचं
समर्थ आहेस तूच
पुढं चालत राहायचं

कलियुगाचे राक्षस तुला
समोर जाळे टाकतील
संस्कारांच्या शिदोरीने
तूच मोकळे करशील

तु कुठेही चालताना
नजर खाली व्हावी
ताई म्हणून हाक
तुला समोरून यावी

कर्तुत्वाचे शब्द तुझे
बातमीला झळकू दे
बहिणीच महत्व हे
विश्वाला समजू दे

श्री जोतिबा आप्पाजी पाटील
मु किटवाड पो होसूर

©Jotiba ताई तूच हो सक्षम..!
jotiba7672359718630

Jotiba

New Creator