Nojoto: Largest Storytelling Platform
jotiba7672359718630
  • 15Stories
  • 6Followers
  • 32Love
    1.1KViews

Jotiba

  • Popular
  • Latest
  • Video
788dc13af48e41b74f7b13e3af08bfc0

Jotiba

चांदण्या रात्रीची पार्टी

पार्टीचा विषय रंगता
मनात मने गुंफली
वरून राजाने त्यात
आपली हजेरी लावली

दिवस टळून गेला
संध्या नटून आली
मित्रांची आमच्या पहा
सगळीच धावपळ झाली

जमवा जमव सामानांची
आवरता हसू फुटले
जागेवर पोहचता बरं
लाईटच काय नडले

एकापेक्षा एक अशी
मेजवानी पंत्राळीत सजली
हातावरून हात सगळे
खाताना म्हणे भरली

बेळगावचा बॉलर आला
मुंबईचा विकेट पडेना
क्षेत्ररक्षणाला जोर चढला
कॅच कोणाकडे येईना

संपले चिकन मटण
भांडी धुवायला घेतली
वाकायला जमेना कोणाला
पोटाची घेरी वाढली

चांदण्या रात्रीची मजा
विनोदाचा हर्ष रंगला
निसर्गाच्या सानिध्यात
मैत्रीला रंग भरला

जोतिबा पाटील

©Jotiba 
  चांदण्या रात्री पार्टी

चांदण्या रात्री पार्टी #मराठीकविता

788dc13af48e41b74f7b13e3af08bfc0

Jotiba

वेड.....!

गुंतले मन बेभान
सहज तुझ्या *प्रेमात*
वार प्रीतीच अबोल
वेड लागलं *मनात*

गोड तुझे बोल
पेरले तू *ह्रुदयात*
फुलला छान मळा
भरली तूच *डोळ्यात*

सोबत बसावं बोलत
हरपून सगळे *भान*
तूच स्वप्न तारका
तुझा पहिला *मान*

सोबतीला तू परी
मुळीच नाही *भीती*
नुसते बसतो पाहत
हरवून जाते *मती*

वेड तुझ्याच मनाचं
संगे प्रेमाची *टोपली*
बसतो तुझ्या छायेत
होना मायेची *सावली*

जोतिबा पाटील

©Jotiba 
  वेड.....
788dc13af48e41b74f7b13e3af08bfc0

Jotiba

तू धनश्री.....!

कळी तू तुझ्या मनाची
सदानकदा फुलणारी
मोगराच्या सुगंधा वाणी 
गोड माया करणारी

नयन तुझे बोलके
मन हलके करतात
गालावरती हलकेच
खळी ते उमटतात

ओठ पाहतच तुझे
हसरे होऊन जातात
हृदयात एक नवीन
चैतन्य निर्माण करतात

नावाची तू धनश्री
नव्या युगाची नारी
माझ्या मैत्रीत एक
अनमोल अशी परी

अशीच राहो मैत्री
जगी हेवा वाटणारी
आपल्या प्रेमाची ती
सतत महती सांगणारी

वर्षा...!

©Jotiba
788dc13af48e41b74f7b13e3af08bfc0

Jotiba

चिऊ गोड पाखरू..

काय सांगू शब्दात
छान दिसते चिऊ
पाहून सुंदर रूप
मन लागले गाऊ

मन पाखरू ती
एकटक पाहत आहे
लाटा च्या लहरी
गोड साद देत आहे

मानेवरी खुलून ती
केसांची माळ छान
शोभून राहिली आहे
चेहऱ्यावर तेज छान

फुलावानी मोहक तू
हसत गोड गोड
पाहत राहावं असच
फुलपाखरा वाणी गोड

©Jotiba
788dc13af48e41b74f7b13e3af08bfc0

Jotiba

रुढीतील महिला

महिला म्हणून वावरायचं
एक पाऊल मागे बसायचं
मानवी जीवनाचे गाठोडे
स्वतःच उचलत राहायचं 

मुलींचं जीवन जगताना
उंबऱ्याच बंधन पाळायचं
आपल्या भावंडांसोबत 
अंगणात हसतच खेळायचं

शिक्षणाचा जरीटोप येता
लग्नाचे बाशिंग घ्यायचं
प्रेमाचं अंगण सोडून हे
दिल्या घरची भांडी घासायचं

वयाचा पदर पडता
अशुभ म्हणून पहायचं
नवीन जीव पुलताना
लक्ष्मी सारखं पुजायच

अंधश्रद्धेचे माप हे
कुठपर्यंत ओलांडायचं
फुलेंची ज्ञानज्योत ती
का विझवून वागायचं 

परंपरेच्या छपराखाली
संसाराचा गाडा ओढायचं
महिला या पाखराला मात्र
रूढीच्या पिंजरात जपायच

जीवन सगळं काचेसारखं
संस्कारांत त्याला लपवायच
रूढी जपायचं कितपत या
हे आता महीलानी ठरवायचं

जोतिबा पाटील

©Jotiba
788dc13af48e41b74f7b13e3af08bfc0

Jotiba

हरवली कुठे तू.....!

काही झालं तरी
शब्द सांगायची
मनातलं ते गुपित
सहजच बोलायची

स्वतः च अंतर मन
खूप हलक करायची
हसत हसतच त्या
सर्व गोष्टी मांडायची

आई वडिलांची तू
स्वतः काळजी ह्यायची
अगदी तूच मोठी आहे
अशी देखरेख ठेवायची

माझे मन पण तूच
मोकळे करून द्यायची
एक एक पैलू सांगत
प्रोत्साहन देत राहायची

हसरे व्यक्तिमत्त्व तुझं
मनात दुःख ठेवायची
वादळी संकटाना तूच
एकटी सामोरे जायची

दिवस बदलले काअसे
कुठ शोधत बसायचं
आठवणी करत नुसते
तुझ्यावर फुगत राहायचं

जोतिबा पाटील

©Jotiba
788dc13af48e41b74f7b13e3af08bfc0

Jotiba

हरवली कुठे तू.....!

काही झालं तरी
शब्द सांगायची
मनातलं गुपित
सहजच बोलायची

स्वतः च अंतर मन
खूप हलक करायची
हसत हसतच सर्व
सर्व गोष्टी मांडायची

आई वडिलांची तू
काळजी स्वतःच ह्यायची
अगदी तू च मोठी आहे
अशी देखरेख ठेवायची

माझे मन पण तूच
मोकळे करून द्यायची
एक एक वाटा सांगत
प्रोत्साहन देत राहायची

हसरे व्यक्तिमत्त्व तुझं
मनात दुःख ठेवायची
अनेक संकटाना तू
एकटीच सामोरे जायची

दिवस का बदलले असे
कुठ शोधत बसायचं
आठवणी करत नुसते
तुझ्यावर फुगत राहायचं

जोतिबा पाटील

©Jotiba
788dc13af48e41b74f7b13e3af08bfc0

Jotiba

!! ताई तूच हो सक्षम !!

राखी बांधलीस तु
तुझा पाठ राखणीला
भाऊराया हा तूझा
राहील का सोबतीला

जीवनाचा मार्ग
पूर्ण करायच तुला
आपल्या मनगटात 
जोर दयायच तुला

वेडी वाकडी वळण
कशाला घाबरायचं
समर्थ आहेस तूच
पुढं चालत राहायचं

कलियुगाचे राक्षस तुला
समोर जाळे टाकतील
संस्कारांच्या शिदोरीने
तूच मोकळे करशील

तु कुठेही चालताना
नजर खाली व्हावी
ताई म्हणून हाक
तुला समोरून यावी

कर्तुत्वाचे शब्द तुझे
बातमीला झळकू दे
बहिणीच महत्व हे
विश्वाला समजू दे

श्री जोतिबा आप्पाजी पाटील
मु किटवाड पो होसूर
ता चंदगड जि कोल्हापूर

©Jotiba
788dc13af48e41b74f7b13e3af08bfc0

Jotiba

!! ताई तूच हो सक्षम !!

राखी बांधलीस तु
तुझा पाठ राखणीला
भाऊराया हा तूझा
राहील का सोबतीला

जीवनाचा मार्ग
पूर्ण करायच तुला
आपल्या मनगटात 
जोर दयायच तुला

वेडी वाकडी वळण
कशाला घाबरायचं
समर्थ आहेस तूच
पुढं चालत राहायचं

कलियुगाचे राक्षस तुला
समोर जाळे टाकतील
संस्कारांच्या शिदोरीने
तूच मोकळे करशील

तु कुठेही चालताना
नजर खाली व्हावी
ताई म्हणून हाक
तुला समोरून यावी

कर्तुत्वाचे शब्द तुझे
बातमीला झळकू दे
बहिणीच महत्व हे
विश्वाला समजू दे

श्री जोतिबा आप्पाजी पाटील
मु किटवाड पो होसूर

©Jotiba ताई तूच हो सक्षम..!

ताई तूच हो सक्षम..! #मराठीप्रेम

788dc13af48e41b74f7b13e3af08bfc0

Jotiba

गावचा धबधबा....!

पावसात माझ्या गावी
धरणाची लिला भारी
पाहायला खूपच गर्दी
निसर्गाची किमया न्यारी

पाणी भरताच धरणाचं
कालव्याला गती फार
गान गातो वाऱ्या सोबत
रात्री गावात झोप गार

वाहत जात मस्तीत
मनामनात त्याची ध्यास
खळखळत प्रेम त्याचं 
भोवताली लोकांना आस

कोसळतो धबधबा तालात
डोळे भरून घेतो पर्यटक
नयनरमय हे सर्व रूप
फोटोत एकापेक्षा एक

जोतिबा पाटील

©Jotiba kavita
loader
Home
Explore
Events
Notification
Profile