Nojoto: Largest Storytelling Platform

तू येतोस कधी दीड,पाच,सात दहा दिवस ,येतोस ते येतोस

तू येतोस कधी दीड,पाच,सात 
दहा दिवस ,येतोस ते येतोस आणि किती
सगळ्यांचा आपलासा होवून जातोस
झोपडे असो किंवा महालाचे दार
तु येतोस मुषकावर बसून स्वार
तुला बसायला सजते मखर पण
तुला माहितेयका ह्यासाठी किती
मुरड घालतात माणसे ,कधी अक्खे  घर
तुला कमी नको म्हणून काहीजण काढतात ऋण,
 आणि साजरा करताततुझा सण, 
काही जण तर भक्ती कमी आणि 
लक्ष्मीचा देखावा करतात,आणि काहीजण कडेला बसून दुर्वा 
फुले विकून संसार करतात,भक्तगण मात्र त्यांचा भाव
सोन्याप्रमाणे तोलतात 
तुझ्या पुढ्यात लागतात ,धनधान्यच्या राशी,आणि 
थोडे शेजारी बघशील तर कितीजण बघत आशेने 
काहीजण असतात अधाशी
नवसाचा म्हणून तुला भेटायला रांगाच रांगा लागतात 
गरीब वस्तीतली मंडळे ओसाड दिसतात
तुला खरेच कारे हे सगळे लागते
तुला भेटल्यावर खरेच कारे सुख भेटते
मला माहितेय तू तर भक्तीचा भुकेला
असतोस ,म्हणूनच तर तू 
अतिभक्तीनेच बुडतोस,
कारण तू तर देव आहेस तू का
बुडशील ,पण भक्तांची इच्छा पूर्ण 
करण्यासाठी बुडून पुन्हा पुढच्यावर्षी येशील 
पुन्हा सगळे सोहळे होतील पण ,
एखादा बुडलेला,दारू पिवून मेलेला
अपघाती गेलेला असे भक्त त्या 
सोहळ्यात नसतील ,तू शोधशील त्यांना 
आपल्या बारीक डोळ्यांनी ,आणि पुन्हा 
एकदा काही लोकजातील आपल्या कर्मांनी,
मग तुझ्यावर आरोप होतील अहो धार्जिनच नाही
आम्हाला गणपती ,हीच तर माणसाची नीती 
जिथे देवावर ही करंटेपणाचे आरोप
होतात, त्याच देवावर करडो खर्च होतात
स्थापन करून हौसेने ,दिमाखाने बुडवतात

                 पल्लवी फडणीस,भोर✍
तू येतोस कधी दीड,पाच,सात 
दहा दिवस ,येतोस ते येतोस आणि किती
सगळ्यांचा आपलासा होवून जातोस
झोपडे असो किंवा महालाचे दार
तु येतोस मुषकावर बसून स्वार
तुला बसायला सजते मखर पण
तुला माहितेयका ह्यासाठी किती
मुरड घालतात माणसे ,कधी अक्खे  घर
तुला कमी नको म्हणून काहीजण काढतात ऋण,
 आणि साजरा करताततुझा सण, 
काही जण तर भक्ती कमी आणि 
लक्ष्मीचा देखावा करतात,आणि काहीजण कडेला बसून दुर्वा 
फुले विकून संसार करतात,भक्तगण मात्र त्यांचा भाव
सोन्याप्रमाणे तोलतात 
तुझ्या पुढ्यात लागतात ,धनधान्यच्या राशी,आणि 
थोडे शेजारी बघशील तर कितीजण बघत आशेने 
काहीजण असतात अधाशी
नवसाचा म्हणून तुला भेटायला रांगाच रांगा लागतात 
गरीब वस्तीतली मंडळे ओसाड दिसतात
तुला खरेच कारे हे सगळे लागते
तुला भेटल्यावर खरेच कारे सुख भेटते
मला माहितेय तू तर भक्तीचा भुकेला
असतोस ,म्हणूनच तर तू 
अतिभक्तीनेच बुडतोस,
कारण तू तर देव आहेस तू का
बुडशील ,पण भक्तांची इच्छा पूर्ण 
करण्यासाठी बुडून पुन्हा पुढच्यावर्षी येशील 
पुन्हा सगळे सोहळे होतील पण ,
एखादा बुडलेला,दारू पिवून मेलेला
अपघाती गेलेला असे भक्त त्या 
सोहळ्यात नसतील ,तू शोधशील त्यांना 
आपल्या बारीक डोळ्यांनी ,आणि पुन्हा 
एकदा काही लोकजातील आपल्या कर्मांनी,
मग तुझ्यावर आरोप होतील अहो धार्जिनच नाही
आम्हाला गणपती ,हीच तर माणसाची नीती 
जिथे देवावर ही करंटेपणाचे आरोप
होतात, त्याच देवावर करडो खर्च होतात
स्थापन करून हौसेने ,दिमाखाने बुडवतात

                 पल्लवी फडणीस,भोर✍