Nojoto: Largest Storytelling Platform

श्रावण श्रावणात का लपंडाव ती खेळत असते सर पाण्याच

श्रावण

श्रावणात का लपंडाव ती
खेळत असते सर पाण्याची?
कधी घालते शिळ मधुर तर
धो धो गाते धून गाण्याची!

इथे घालते सडा तिथे तर
मध्येच देते उन्हास टाळी
निसर्गासही आनंद होतो
इंद्रधनू माळतो गळी !

शहारून जाती झाडे वेली
पाखरांची  फडफड बोली 
ऊब मिळाया गारठ्यात मग
धुर ओकती खेड्यात चुली!

चैतन्याचा मास मनोहर
श्रावण म्हणजे आनंदमोहर
सणासुदीचा हा पेटारा
उधळत असतो जलधारा!

■ जयराम धोंगडे

©Jairam Dhongade #श्रावण
श्रावण

श्रावणात का लपंडाव ती
खेळत असते सर पाण्याची?
कधी घालते शिळ मधुर तर
धो धो गाते धून गाण्याची!

इथे घालते सडा तिथे तर
मध्येच देते उन्हास टाळी
निसर्गासही आनंद होतो
इंद्रधनू माळतो गळी !

शहारून जाती झाडे वेली
पाखरांची  फडफड बोली 
ऊब मिळाया गारठ्यात मग
धुर ओकती खेड्यात चुली!

चैतन्याचा मास मनोहर
श्रावण म्हणजे आनंदमोहर
सणासुदीचा हा पेटारा
उधळत असतो जलधारा!

■ जयराम धोंगडे

©Jairam Dhongade #श्रावण