Nojoto: Largest Storytelling Platform

साधी सुई टोचली तरी किती चिरकतो माणूस मग सुरीने करा

साधी सुई टोचली तरी किती चिरकतो माणूस
मग सुरीने कराकर गळे कापतात रं हे
कसं वाटतं असेल?
कबुतराच्या चोरीवरून, साफ न केलेल्या मोरीवरून
जातीनं हीनवून स्वाभिमान मारतात रं माणसं
कसं वाटतं असेल?
मतांसाठी घर गाठतात आपुलकीने भेटतात
पैसे वाटतात पाय धुवून चाटतात
पण निवडून आलं कि आपलं काम झालं कि
तुमचे हक्क मारतात कि रं ही माणसं 
कसं वाटतं असेल?
गॉगल घातल्यानं खून, मिशी ठेवल्यानी हल्ला
नोकरीला लागल्याने चोरीचे आरोप
आर्थिक उभं राहिल्यानं पंख कापतात रं ही माणसं
कसं वाटतं असेल?
गोमूत्राला ओठात, शेणाला पोटात
ढोंगी साधुला घरात, अंधत्वला उरात 
पण माणसाला गोठ्यात ही ठेवतं नाहीत रं ही माणसं
कसं वाटतं असेल?
साधा पदर ही घसरला तर शरमते कि बाई
नग्न धिंड काढतात, अमानुष बलात्कार करतात
सळया खुपसतात, कातडं उपसतात रं
सांग न तूच कसं वाटतं असेल?

- अमित घायाळ

©Amit Ghayal #poem #Life #discrimination #HUmanity #insan
साधी सुई टोचली तरी किती चिरकतो माणूस
मग सुरीने कराकर गळे कापतात रं हे
कसं वाटतं असेल?
कबुतराच्या चोरीवरून, साफ न केलेल्या मोरीवरून
जातीनं हीनवून स्वाभिमान मारतात रं माणसं
कसं वाटतं असेल?
मतांसाठी घर गाठतात आपुलकीने भेटतात
पैसे वाटतात पाय धुवून चाटतात
पण निवडून आलं कि आपलं काम झालं कि
तुमचे हक्क मारतात कि रं ही माणसं 
कसं वाटतं असेल?
गॉगल घातल्यानं खून, मिशी ठेवल्यानी हल्ला
नोकरीला लागल्याने चोरीचे आरोप
आर्थिक उभं राहिल्यानं पंख कापतात रं ही माणसं
कसं वाटतं असेल?
गोमूत्राला ओठात, शेणाला पोटात
ढोंगी साधुला घरात, अंधत्वला उरात 
पण माणसाला गोठ्यात ही ठेवतं नाहीत रं ही माणसं
कसं वाटतं असेल?
साधा पदर ही घसरला तर शरमते कि बाई
नग्न धिंड काढतात, अमानुष बलात्कार करतात
सळया खुपसतात, कातडं उपसतात रं
सांग न तूच कसं वाटतं असेल?

- अमित घायाळ

©Amit Ghayal #poem #Life #discrimination #HUmanity #insan
amitghayal5775

Amit Ghayal

New Creator