Nojoto: Largest Storytelling Platform
amitghayal5775
  • 50Stories
  • 180Followers
  • 444Love
    580Views

Amit Ghayal

दिल की बाते कागजो पर लिखता हुं._✍🏻अमित.

  • Popular
  • Latest
  • Video
07ac97c5761daf1bd01b89db6df302f7

Amit Ghayal

चारित्र्याच्या गोष्टी मैफिलीत रंगल्या होत्या
कॅरेक्टर मात्र आज गैरहजर दिसलं होतं.
हिताच्या मताच्या स्वाभिमान लढाईच्या गोष्टी ओठांवर
विकत नाही स्वतःला म्हणनारे आणी लक्ष फक्त नोटावर
मला गर्दी दिसली नुसतीच गच्च माणसांणी भरलेली
सगळेच नुसते मुखवटे एखाद खरी उरलेली
उकरावीत जुनीच मडी मेलेली अन पुरलेली
चळवळ मरताना दिसते तेंव्हा अशी चारित्र्यवाण माणसं चं ऑक्सिजन बनतात
फाटक्या आमच्या मूव्हमेंटच्या गोधडीला हेच तर विनतात.
कोर्परेट मध्ये ऐसीत पोजिशन मिळाल्या नंतर
 कसं होतं आपोआप वस्ती वाड्यापासून अंतर
मला ती घामानं भिजलेली मळकी माणसं यांच्या पेक्षा स्वच्छ वाटतात
ते आयुष्यभर विकले नाहीत कधीच, हे पदासाठी ही बूट चाटतात
ती माणसं खूप रेअर आहेत ज्याला ही करुनेच्या साखळीसारखी माणसं भेटतात.
आत्ता खुशाल आपलं आपण उध्वस्त होण्याचा रिस्क घेतल्यापासून
आणी अशा उग्र विचारांच्या दुटप्पी अभिनयावर मुतल्यापासून
अजिबात ओझं नाही आपल्यावर.
आम्ही आमच्या झोपड्या, आमची माणसं आणी आमची ही प्रामाणिक
लढाई जिवंत ठेऊ स्वतःला मारत वेळोवेळी लढे उभारत.
आम्ही रक्तबंबाळ पाय घेऊन काचेच्या तुकड्यानी भरलेल्या
रस्त्यावरून चालतं आहोत.
 होय अगदी इतकंच कठीण आहे यावर चालणं आणी एका पाऊलाने ही हालनं.
आम्हाला दिसतात हातात स्वाभिमानी झेंडे घेऊन
भाकरी चिंदकात बांधून शहराकडं पायी चालतं येणारी
तरुणांना लाजवतिल अशी म्हातारी माणसं.....
आणी जो पर्यंत ही माणसं चालतं आहेत हे
 वन उमटत आहेत ही पाऊलवाट बनत जाईल.
आणी मी त्या प्रत्येक बोट दाखवणाऱ्या पुतळ्यातल्या माणसाकडे आशेने बघतं राहिलं.
तेंव्हा दिसेल मला त्या प्रत्येक माणसात 
आमच्यातला स्वाभिमान शब्द एका आंबेडकर नावाच्या सूर्यानं शिकवला आहे.
तोच आमचा कॅप्टन त्यानंच हा लढा अजून ही टिकवला आहे.



- अमित घायाळ

©Amit Ghayal  #marathi
07ac97c5761daf1bd01b89db6df302f7

Amit Ghayal

साधी सुई टोचली तरी किती चिरकतो माणूस
मग सुरीने कराकर गळे कापतात रं हे
कसं वाटतं असेल?
कबुतराच्या चोरीवरून, साफ न केलेल्या मोरीवरून
जातीनं हीनवून स्वाभिमान मारतात रं माणसं
कसं वाटतं असेल?
मतांसाठी घर गाठतात आपुलकीने भेटतात
पैसे वाटतात पाय धुवून चाटतात
पण निवडून आलं कि आपलं काम झालं कि
तुमचे हक्क मारतात कि रं ही माणसं 
कसं वाटतं असेल?
गॉगल घातल्यानं खून, मिशी ठेवल्यानी हल्ला
नोकरीला लागल्याने चोरीचे आरोप
आर्थिक उभं राहिल्यानं पंख कापतात रं ही माणसं
कसं वाटतं असेल?
गोमूत्राला ओठात, शेणाला पोटात
ढोंगी साधुला घरात, अंधत्वला उरात 
पण माणसाला गोठ्यात ही ठेवतं नाहीत रं ही माणसं
कसं वाटतं असेल?
साधा पदर ही घसरला तर शरमते कि बाई
नग्न धिंड काढतात, अमानुष बलात्कार करतात
सळया खुपसतात, कातडं उपसतात रं
सांग न तूच कसं वाटतं असेल?

- अमित घायाळ

©Amit Ghayal #poem #Life #discrimination #HUmanity #insan
07ac97c5761daf1bd01b89db6df302f7

Amit Ghayal

हसणाऱ्या ओठा मागे लपलेले दुखणे
कित्येक बरोबर निर्णयात अनेकदा चुकणे
आजूबाजूला लपलेले कित्येक खोटे चेहरे
चौकटीत सजलेले कित्येक इथले मोहरे
मनातलं ओळखण्याची कला आत्ता शिकलोय
म्हणूनच या गर्दीत अजूनही टिकलोय
वया पेक्षा मोठं ही व्हावं लागलं
कित्येकदा खरं सांगण्यासाठी
 खोटं ही व्हावं लागलं
पण आत्ता फॉर्मॅलिटीचे सगळे चेहरे कळतात
कारण खोटे लावलेले मास्क कधीतरी गळून पडतात
आयुष्य रंगमंच आहे आणी माणूस कलाकार असतो
म्हणूनच बहुतेक दुखणं लपवून अगदी खोटं हसतो
काल सापडली एक खदान, त्यात 
कित्येक कविता  रद्दीत पडल्या होत्या 
त्यावर शब्दांची किंमत माहित असणाऱ्यां
कित्येक पिड्या घडल्या होत्या.
माझं लिहिणं गरजेचं होतं का?
मलाच प्रश्न होता?
चव नसणाऱ्या आयुष्याकडं लोणचं बघायला मिळालं
शब्दातून तुझ्या आम्हाला हे हे कळालं
हे शब्द ऐकू आल्यावर खोरं फेकलं आणी पेन उचलला
आणी मी लिहू लागलो...


- अमित घायाळ

©Amit Ghayal #cactus #Ka #Life #poem
07ac97c5761daf1bd01b89db6df302f7

Amit Ghayal

खिसा फाटका असताना इथवर
आलोच आहोत की
इतक्यात काय गुडघे टेकायचे
थोड पुढं ही जाऊच की
हा आधार बिधार खांदे आपल्याला नाहीत मिळाले
पण मग काय झालं
आपल्या वाट्याचे दुखणे आपण
 बघून घेऊच की
हा माहित आहे शहर गर्दी
 मुखवटे दुखवटे खोटी पाटी माणसं
पण आपल्या वाट्याच जगून घेऊ
बाकी काय ते बघून घेऊच की..

- अमित घायाळ

©Amit Ghayal
  #Moon #marathi #alfaaz #kavi
07ac97c5761daf1bd01b89db6df302f7

Amit Ghayal

चुका झाल्या की थुंका न लावता
स्वतः लाच मुका करून
पाठीवर बुक्का द्यावा.....

स्वतःच स्वतःने जाणून घ्यावं आणि अभ्यासाव
स्वतः वरच कराव्यात रिसर्च कारण जगभर जाणणाऱ्या 
माणसाला स्वतः बद्दलच आकलन आधी आसाव.
जगाचे मित्र व्हा किंवा नका पण स्वतःचे खास असायला हवेत, 
स्वतःचा एकटेपणा ही माणसाला आनंदाने
 जगता यायला हवा.
एकटेपणा ची भीती ते एकटेपणा स्वतःला जाणून
 घण्याची संधी या 2 गोष्टी कळल्या की जगणं सोपं होऊन जातं. 
कारण जब तक हम हार मानते नही तब तक हम हारते नही...

- अमित घायाळ.

©Amit Ghayal #poem 

#Seating
07ac97c5761daf1bd01b89db6df302f7

Amit Ghayal

जुगार खेळावा आयुष्याचा तशी तल्लफ शिकण्याची लागेल,
उध्वस्त व्हायचय ठरूनचं मैदानात उतराव लागेल,डिस्टर्ब आणि 
अनकंफर्टेबल व पूर्ण ब्रोकन काळीज घेऊन रक्तबंबाळ झालेल्या 
पायाला काचावरून घेरून निघाव लागेल,
अन् घरच्यांनी ही मुंजा मरीआई अन् दगड धोंड्याला वाहतात 
तशी वाहावीत लेकरं शिक्षणाला.
अनेक आरोप आणि गुन्हेगारी चौकटीत बसविल सोसायटी
 तरीही सम्यक रस्त्याचं लोकेशन आणि पिस इंजेक्शन 
कायम असावं आपल्याकडं...
आपला प्रवास खडतर किती आहे या साठी पुढे स्टेज आहे, आधी
 हा प्रवास पूर्ण व्हायला हवं. 
त्या साठी गरजेचं आहे नियोजन,ध्येय, डेडीकेशन,
धडपड,तळमळ, परेशानी,त्रास, अडचणी,चिंता,आणि 
ध्येयवेडेपना.......

घाम आला पाहिजे ए सी मध्ये बसून दुष्काळ इमॅजिनेशन नकोय.

- अमित घायाळ

©Amit Ghayal #marathi #poem 
#Seating
07ac97c5761daf1bd01b89db6df302f7

Amit Ghayal

अगर वासना ना होती
तो देख लेना मोहबत्त सबसे खुबसुरत होती....

- अमित घायाळ

©Amit Ghayal #Love 

#Soul
07ac97c5761daf1bd01b89db6df302f7

Amit Ghayal

मग निवड पद्धतीनी लावला आमच्या बुद्धीवर बट्टा,
यातून जन्म घातला स्वतःवर ओझ असणाऱ्या शंकेला.
विद्वत्तेचं उत्तर माहीत असताना ही आयोग्यतेची खिडकी दावली, 
संख्यात्मक मोजणीच्या चौकटीत बांधून स्ट्रगल चा घेतला जीव आमच्या,
आणि मिनिटात दाबायला पाहिला आवाज आमचा
 जो कमवला झिजून मागच्या अनेक वर्षात.
हिस्कवला बेंच त्यांनी कारण त्यावर बसणारा हा 
प्रश्न विचारेल आणि आवाज ही उचलेल मग,
अयोग्य तेचा सिक्का मारून अपडेट नसल्याच्या बुक्का मारून 
दावली थांबण्याची वाट.
लक्षात असू द्या
ब्लू बर्ड फडफडनं आणि धडपडणं सोडणार नाही..

✊🏻💙🔥
- AK

©Amit Ghayal #Life 
#Night
07ac97c5761daf1bd01b89db6df302f7

Amit Ghayal

दिलं से दिलं तक...
लै धन्यवाद...❤️😚🙏🏻

काल शुभेच्छांचा पाऊस पडत होता, मोबाईल कॉलिंग लिस्ट फुल्ल होती, प्रत्येकाने त्यांचं प्रेम,आपुलकी,कनेक्शन, शुभेच्छा व्यक्त केल्या, आणि माझा दिवस सुंदर बनवला, 
तुमच्या सारखी माणसं माझी आपली हक्काची आहेत हीच माझी कमाई आहे.
हीच माझी टोटल बँक सेव्हिंग आहे...
सर्व सोशल माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छा  दिल्यात 
आणि माझ्या चेहऱ्याचा ग्लो वाढवलात..
तुमच्या सदिच्छा आणि त्यातील क्रिएटिव्ह प्रेम
 मला गुलाब जाम पेक्षा ही गोड वाटलं.
काल पासून कट करत असलेल्या केक ची यादी तुमच्या
 मेसेज शुभेच्छांची जी लांब लचक यादी म्हणजे माझ्या 
लहानपणापासून ते शहाणपणापर्यंत असणाऱ्या प्रवासात कमावेलेली कमाई आहे.
तुम्हा सगळ्यांना माझं आयुष्य एवढं स्पेशल आणि 
सुंदर बनवण्यासाठी लव्ह यू ...आणि BIG Thank you 


आणि हा अमित  तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल,
आयुष्यातला आनंद बनण्यासाठी कायम तत्पर असेल हा शब्द आहे आपला...
या ब्लू बर्ड चे पंख कायम फडफडत राहतील
तुमच्यासाठी.... वादा रहा.
Always with you.

Thank you so much..
Love you All...... 💗🥰💞

-  अमित घायाळ..

©Amit Ghayal thank you 

#AWritersStory

thank you #AWritersStory

07ac97c5761daf1bd01b89db6df302f7

Amit Ghayal

भुख पर लीखणे के लिये भूखा होना
 बहुत जरुरी है.
 AC मे बैठकर आकाल पर लिखते हो 
कैसे कवी हो तुम

- अमित घायाळ

©Amit Ghayal #kavi #Hindi 
#Hope
loader
Home
Explore
Events
Notification
Profile