माझी पहिली कविता जुन्या डायरीची पाने आज नकळतच मागे वळली आणि माझी पहिली कविता त्यातूनही कशी डोकावली क्षणभर कशी आठवणीतले आसवांची फुलेही तरळली उगाच तिच्या शब्दांवरती बोटे मग हळुवार फिरली मन तिचेही भरेना अन शब्द सुचेना मग मलाही तीच होती त्या क्षणाला अन् माझ्याच सोबतीलाही दुख-सुख कसे सर्व माझे वाटुनी तिनेच मग घेतले धैर्य या लेखणीत आज तिनेच नव्याने कसे पेरले पद्मा शब्दात खेळते फक्त आजही जणू तिच्याचमुळे मनातल्या वैखरीला वाचाही खरी आली पहिल्या कवितेमुळे ©पद्मवैखरी काही जुन्या आठवणी.... #Books