Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser3993991536
  • 16Stories
  • 16Followers
  • 107Love
    136Views

पद्मवैखरी

पद्मा परी गंध पसरवूनी वैखरी तव व्यक्त होई....

firstblog0318.blogspot.com

  • Popular
  • Latest
  • Video
5dfd9e38d4cf41e9641ab7319c522529

पद्मवैखरी

आनंदाची लालसा

काय असावी त्या मनी लालसा ?
कसला मिळाला असेल आनंद ?
त्या कोवळ्या क्षणात कितीदा
फसला असेल ना हो राग द्वंद ?

धाव तिची असेल सुखापर्यंत
किंवा असेल तो छंद क्षणिक
पण वेगातही तिच्या ओठीचे
हास्य ते किती निखळ मौलिक

तिच्या आनंदात आज बघा
चार चेहरे सुखावले कसे ?
या प्रचंड भयाण विराणतेत
मनावरचे मळभ दूरावले जसे

सुख म्हणून शोधणारे आपण
सुख याहून पलीकडे काय ते?
ओठीच मिळणारे शब्द आपले..
की त्यात दुरावणारे बंध ते..

तिच्या आनंदाची लालसा जरा
परत मनात उतरवता येईल का...?
त्या बालपणात रमताना पाहून
पुन्हा त्यास गाठता येईल का..?

             -पद्मवैखरी, यवतमाळ

©पद्मवैखरी #JumuatulWidaa
5dfd9e38d4cf41e9641ab7319c522529

पद्मवैखरी

रामनवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा

©पद्मवैखरी

8 Love

5dfd9e38d4cf41e9641ab7319c522529

पद्मवैखरी

#Navratra2021
5dfd9e38d4cf41e9641ab7319c522529

पद्मवैखरी

तुला हारतांना...

तुझ्या प्रेमाच्या बंधनात
गुदमरतेय मीच आता
श्वासही एकटे झाले
तुला रोज समजावीता
मनावरचे घाव शब्दाचे
ओठीच विरले ते आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

प्रेम तुझे, वेळ ही तुझी,
मर्जी तुझी अन् मीही
या लपंडावात होणार 
हार फक्त माझीच ही
पण तरीही तुझ्या या 
खेळास संपवेल मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

रोजची नवे ते बहाने हे 
रोजचेच सोसणे झाले
तुझ्या या वागण्याचे खोटे 
दाखले फक्त मग राहिले
तुझ्या प्रत्येक वळणावर 
नाही वळणार मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

किती आणखी मि या 
कोंडीत राहू सांग मला
आस या प्रेमाची मग
येईल कधी रे तुला?
काटेरी या क्षणाची मीच 
सोबती मलाच आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

ती शिक्षा रुसव्याची अन्
परीक्षाही झाली दुराव्याची
तुझ्या विना अपेक्षाच 
नाही करवत राहण्याची 
दोन्ही सोडविताना मीच 
हरले त्यातही अशी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

©पद्मवैखरी तुला हारतांना...

तुला हारतांना... #Shayari

9 Love

5dfd9e38d4cf41e9641ab7319c522529

पद्मवैखरी

परतीची पानगळ..

पानगळ तीही
जरा स्तब्ध होती
पावले तुझीच
परतली होती

पायाशी पातेही
तिक्ष्ण शुल झाली
पाण्यात निखारे
त्या पेटली होती

हात  निसरडा
असा दूर झाला
कोरड्या अश्रूला
वाट रीती होती

मी पाठमोरीच
निशब्दहि झालो
तू सोडून तेव्हा
दूर गेली होती

साथ सोबतीची
देण्या मज होती
पण तु सोडून
परतली होती

-पद्मवैखरी, यवतमाळ

©पद्मवैखरी

6 Love

5dfd9e38d4cf41e9641ab7319c522529

पद्मवैखरी

एक गझल आस धरुनी...
 गझलेचा हा पहिलाच प्रयत्न
#PoeticAntakshri

एक गझल आस धरुनी... गझलेचा हा पहिलाच प्रयत्न #PoeticAntakshri

47 Views

5dfd9e38d4cf41e9641ab7319c522529

पद्मवैखरी

भास..

आज परत तोच भास अन्
पुन्हा तुझी आठवण छळते आहे
मनातल्या काहूराला माझ्या
माझ्याच वादळाने घेरले आहे

प्रश्न होती सरळ साधी माझी
वाटेवरील आडव्या त्या वळणाची
उत्तराच्या तुझ्या खोट्या आशेच्या
विरह सरणावर मी जळते आहे

गेलास ना सोडून अर्ध्यावरती
मिळालाय दुरावा तुला कायमचा
पण तरी साथ तुझी आजही
का येऊनी पुन्हा मला छळते आहे

तुझ्या मिठीतला गोडवा सख्या
मी माझ्यातच जपलाय आजही
तरी आठवणीचे हे मळभ किती
आणखी मला सोसायचे आहे

कधी मिळतील हे क्षण सांग..
तुझ्या आणि माझ्यातील अंतराचे
सोडूनी हे सर्व मागे मलाही आता
तुझ्या जवळच आता यायचे आहे..
      तुझ्या जवळच आता यायचे आहे..

                            -पद्मवैखरी, यवतमाळ

©पद्मवैखरी #standAlone
5dfd9e38d4cf41e9641ab7319c522529

पद्मवैखरी

माझी पहिली कविता

जुन्या डायरीची पाने आज
नकळतच मागे वळली
आणि माझी पहिली कविता
त्यातूनही कशी डोकावली

क्षणभर कशी आठवणीतले
आसवांची फुलेही तरळली
उगाच तिच्या शब्दांवरती
बोटे मग हळुवार फिरली

मन तिचेही भरेना अन
शब्द सुचेना मग मलाही
तीच होती त्या क्षणाला
अन् माझ्याच सोबतीलाही

दुख-सुख कसे सर्व माझे
वाटुनी तिनेच मग घेतले
धैर्य या लेखणीत आज
तिनेच नव्याने कसे पेरले

पद्मा शब्दात खेळते फक्त
आजही जणू तिच्याचमुळे
मनातल्या वैखरीला वाचाही
खरी आली पहिल्या कवितेमुळे

©पद्मवैखरी काही जुन्या आठवणी....

#Books

काही जुन्या आठवणी.... #Books

3 Love

5dfd9e38d4cf41e9641ab7319c522529

पद्मवैखरी

*सत्य झोंबते तेव्हा...*

सत्य झोंबते तेव्हा
     मनाचे खोटे लपवत
     दुसऱ्याला कमीही लेखत
     आपल्याच बड्या विश्वात
     कसे तेही उंच उंच उडत

अन्  तेव्हाही
     स्वतःची चूकच खरी
     हीच कमतरता ठरते
     पण त्याला मान्यही
     करण्या हिंमत नसते

पण तरी मग
     दुसऱ्यावरती शिरजोरी
     यातच दिलासा घेऊन
     आपलेच खरे ते करत
     पुढच्याला दोष देऊन

अन् अशातच
     स्वतःला सांभाळताना
     शब्दास दारही ती येते
     विचारात विष येऊन
     मनाचाही क्लेश होते

हे सगळे होतांना
     नाते हळुच दोघांतूनही
     दूर जातात मग जेव्हा
     स्वतःचे खोटे झाकतांना
     खरे सत्य झोंबते तेव्हा...
              सत्य झोंबते तेव्हा...

         ©® पद्मवैखरी #citysunset
5dfd9e38d4cf41e9641ab7319c522529

पद्मवैखरी

तुझीच साद...

नको ति साद आता
मनाशी मनाचे वाद आता
कफल्लक ठरलो प्रेमात मी
कशाला हवी ति साद आता

नको सोसने हे गंध प्रितिचे
चोरटे इशारे मदहोश नजरेचे
नको माझे नाव तुझ्या ओठावर आता
झालो मि हसण्याचा फक्त विषय आता

सज्जनाच्या मैफिलित बदनाम मि झालो
गुन्हा तुझा असूनही गुन्हेगार मि झालो
प्रेमाच्या बाजारात माझा लीलाव आता
क्षुल्लक असूनही मिळेना खरीदार आता

सुके अश्रु साठवत गेलो तुझ्यासाठी
मनाला अजूनही सावरित मि होतो
प्रेम बिम हे फक्त दाखले झाले आता
प्रेमात बादशहा फकीर झालो मि आता

गंधाळलो होतो मीच,दोष तुझा नव्हता
तू वळली तेव्हा श्वास माझा बाकी होता
येऊन परत मग नको गाळूस आसवे आता
घेतोय अखेर विरहित प्रेमाची झोप आता

                                - पद्मवैखरी🌷 #प्रेम_कविता #विरहाचे_गाणे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile