White #माझ्या आयुष्यपुष्पातील गंध.... शब्दवेडा किशोर माझ्या आयुष्यपूष्पातील गंध कोण जाणे कुणी चोरला माझ्या आयुष्यपाकळ्यांनी दुनियेच्या गर्दीतील हे शापीत असं एकटेपण बहाल केलं मला स्वतः अल्प सुखात कायम जगून दुनियेवर मात्र सदा सुखाची बरसात कर असा आदेशच त्या शापीत जगण्यासहीत जणू नियतीनेच दिला मला कितीही प्रयत्न केले तरी चांगल्या सुरांची साथ संगत मिळेना माझ्या आयुष्याला माझंच आयुष्य बहुधा माझ्यावरंच झालं ओझं त्याचादेखील आता भार पेलता येईना मला कुठवर जगू असा शापीत मी घेऊन सोबतीस कोरा चंद्र असलेले हे असे आगळे वेगळे आयुष्य माझे शापीत जगण्याचे हे विरलेले धागे हाती धरूनी कुठवर उत्तरं देत जगू या माझ्या जन्मानेच मज लाभलेल्या फाटक्या नियतीस हे अजूनही नीट उमजेना मला वाट बघतोय मी कधी संपेल किंवा संपेल की नाही हे माझे अस्तित्व असुनही नसलेले जगणे अन् लाभेल का मजला कधीतरी सुंदर साजिरे सालस अन् सुखबहर असलेले असे मनमोहक ते रुपडे माझ्या आयुष्याला ©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून