Nojoto: Largest Storytelling Platform

तुम्ही माणसांनी बाजार मांडलाय, बाजार मांडलाय नुसता

तुम्ही माणसांनी बाजार मांडलाय,
बाजार मांडलाय नुसता!
आमच्या स्रित्वाचा,आमच्या चारित्र्याचा,
आमच्या अब्रूचा,लज्जेचा !!

आम्हाला कुत्र्या,मांजरागत पाळलं जातयं,
आमच्या नग्न देहावर, 
कागदाचे तुकडे फेकून, 
छक्कंदेखील आमचं मालक होतयं.

तुमच्या देवभूमीतच कळस गाठताहेत,
बलत्काराचे भरमसाठ आकडे !
आम्हाला काय न्याय देणार !
ही मंत्रालयात बसलेली माकडे !!

अहो !आम्हाला दिनादास् रस्त्यावर पेटवा !
आमची नग्न धिंढ काढा !!
आब्रुचे लक्तरं तोडा !
बिनधास्त आमच्यावर चढा !!

खुशाल घाला शिव्या !
इथल्या हर एक महापुरूषाला ,
संविधानाला ! तुमच्या आमच्या सात पिढ्याला!!
मी तर लावलयं उभं आयुष्य तुमच्या मढयाला !!."
(कवी:रा.या.सोनवणे पाटील.) "बाजार !!."
तुम्ही माणसांनी बाजार मांडलाय,
बाजार मांडलाय नुसता!
आमच्या स्रित्वाचा,आमच्या चारित्र्याचा,
आमच्या अब्रूचा,लज्जेचा !!

आम्हाला कुत्र्या,मांजरागत पाळलं जातयं,
आमच्या नग्न देहावर, 
कागदाचे तुकडे फेकून, 
छक्कंदेखील आमचं मालक होतयं.

तुमच्या देवभूमीतच कळस गाठताहेत,
बलत्काराचे भरमसाठ आकडे !
आम्हाला काय न्याय देणार !
ही मंत्रालयात बसलेली माकडे !!

अहो !आम्हाला दिनादास् रस्त्यावर पेटवा !
आमची नग्न धिंढ काढा !!
आब्रुचे लक्तरं तोडा !
बिनधास्त आमच्यावर चढा !!

खुशाल घाला शिव्या !
इथल्या हर एक महापुरूषाला ,
संविधानाला ! तुमच्या आमच्या सात पिढ्याला!!
मी तर लावलयं उभं आयुष्य तुमच्या मढयाला !!."
(कवी:रा.या.सोनवणे पाटील.) "बाजार !!."

"बाजार !!."