Title:: तिला मात्र चंद्राचं कौतुक...... by Dharmendra Gopatwar बसलो होतो मी तिच्याजवळ ती चंद्राला बघत होती..... तिचं मी रूप न्याहाळत होतो , ती मात्र चंद्राची स्तुती करत होती मी तिच्या गौरवर्ण रुपावर हृदय हारलो, ती मात्र चंद्रावर मोहित होती मला तिच्या सौंदर्याचं तर , तिला मात्र चंद्राचं च कौतुक वाटत होत.... मी तिच्या जवळ बसल्या बसल्या मला पहिली कविता सुचली ... तो ही तिच्या सौंदर्यावर , आणि ती चंद्रावर मोहित होऊन तिच्या वहीत शंभर कविता केलेलं होत ....... ती चंद्रावर कविता करताना तिला तो चंद्रावरचा डाग ला तिलेची सज्ञा देऊन चंद्राचं कौतुक पर वाक्य लिहीत होती ... मी मात्र तिच्या मानेवरचा तो तीळ बघून माझ्या कवितेत तिच्या सौंदर्याचा वर्णन करीत होतो .... तिच्या डोळ्यात बघता चंद्राचे प्रतिबिंब दिसतं होत माझ्या डोळ्यात मात्र तीच च रूप बसलं .... त्या रात्रीला चंद्राचा त्या पांढऱ्याशुभ्र प्रकाशात तिच्या डोळ्यांना मोह झाला होता , मला मात्र असं वाटतं होत की , तिच्या रुपामूळे चं चंद्राच्या रुपात आणि त्याच्या प्रकशात आणखी भर पडलेलं असावं.... त्या रात्री चंद्राच्या प्रकाशात आम्ही दोघे बसलेलो ती मुळात होती कवी ... पण तिच्या सुवर्ण रूपावर ओळी लिहिता - लिहिता मी कवी झालो .... ती चंद्रासोबत ताऱ्या वर दोन ओळी रचली मी तिच्या भोवताली चमकणाऱ्या काजव्यांवर चार ओळी माझ्या कवितेत सामाविष्ट केल्या...... ती कविता करताना चंद्रासोबत तारे आकाश यावर तिच्या कवितेची चौथी ओळ पूर्ण केली ..... ती चंद्राला न्याहाळत कविता करताना तिची फक्त चारोळी च झाली पण मी तिच्या सौंदर्यावर अख्खं कविताच केला ....✍️ AUTHOR_DHARMENDRA GOPATWAR कवी- मन (मनातलं ओझं पानावर) ©Dharmendra Gopatwar #तिला मात्र चंद्राचं कौतुक