Nojoto: Largest Storytelling Platform

अस्थी शेवटचा अर्थ माणुसकी च्या कष्टानं दगड वाटची प

अस्थी शेवटचा अर्थ माणुसकी च्या कष्टानं दगड वाटची पायपीट करताना पायाच्या टाचच्या खाचा जवा भळाभळ लाल सुर्ख रक्त गाळत होत तवा ध्यान गेल नाही का रं का अजून डोक फोडायची वाट बघावलीस तु बसलास आरामात माणसांचा खेळ बघत अन् आम्हाला आमच्या कर्माची फळ भोगायला दिलीस. आता तीच फळ पोट भरत भरत काळचाची लाही लाही तोडते. अस बघून मनाला खुश होत असशील बाबा आम्हा जगण्याचा निरर्थक पाठ्यक्रम प्रारब्दाच्या उजळन्या गातोय. जगण्यातला गंजिलपणा कुठ कुण्या दगडासमोर घासावं एवढं तरी प्रारब्द आयुशी निवडलं किमान डोळ्याची पारण भरभरून तुझ्या दारात गाळावी एवढी सोय करुन घेतली नशिब म्हणावं, सवंगडी घातली त्याच्याशी ज्याची टाचही त्याच्या चलायच्या लायकीची नाही. समदीकडं नुसती हुरहूर रोज मेल्याला अजून कोणता यम मारणार तरी भाग लेहुन ठुलायं. प्रश्नांची उत्तरं माणसागणीस ऐगळीमांडून टाकलीस कुणाचा पाय धरावं एवढी पण किनार त्याचीच उंबर झिजायला ठुलिस इतकेच खरे उपकार, सप्नात तरी कोण गावल ती कोरडं पडलेली हजार वरसाची रोश काढणारी भूक कोरड्याच सपनात काट्यासारखी आतून सुराख करणारी कशी मान्य करणार रे. भरभरून जगाची लाड पुरवणारी आमच्या नशीबी त्यांची उलटी बी पदरात साठवायला पदर नाही . इतक अंधार काळ कुट जीन मरणाच्या उंबरवट्यावर रोजच आपटंनार कुठं कोण्या कामाची क्षुब्द स्तुती मनाला भरवलं सांग रे बाबा.काळवंटलेल मशीसारखं हाडकांच जाळ कुठपर्यंत वाहत दारोदार फिरायच, दया माणसालाच दिली का आणि तु कठोर दगडाचा ना तुझ्याशी प्रारब्दाच्या गोष्टी करतोय, जगायचं रे अजून तुझ्यावाचून मी नाही हा मनाशी निर्धार हाय जगाच विश्वास उडूदे शेवटचा कन इथच झिजवीन एवढाच रे जीव कुठवर पाषाणाचा घाम गाळायचा रे , आता निवांत झोपू दे, समाधानालाही आता ध्यानस्थ बसू दे, काळाच्या पलिकडच जग या आत्म्याला बघू शेवट मरण सत्य आहे, ज्वालाच्या उकळीला आनंदात फडफडू दे निघणारऱ्या काजळीला आसमांन गाठू दे, हाडांच खऱ्या अर्थान पाणी बणू दे, मरणाच ऐश्वर्य या जगताच्या डोळ्यान या भडकणाऱ्या रक्ताच्या दिव्या बघू दे…… या हाडांच्या राखची अस्थी होताना या माणूसकीला बघू दे……………. रे देवा हे ईश्वरा अनंता…..
 -क.वि ७३८७४४३४१२

nojotouser8170005765

क.वि

New Creator