लिहिलं खूप काही मनातलं, कसं सर्वच अगदी समोर ठेवलं, पण मैत्रीसाठी शब्दांना माझ्या, उगाच इतके दिवस दूर ठेवलं... मैत्री म्हंटलं तर तोकडे पडले, अंतरातले माझ्या भाव, आठवताच मग सारे क्षण, उमलू लागले हळवे घाव... निरपेक्ष असं ते घालवलेलं, बालपण आलं नझरेपुढे, स्वच्छंदी मैत्री तशी, उभ्या आयुष्यात पुन्हा न घडे... वयात येत असता जोडलेली, मैत्री क्षणिक होऊन बसली, टिकली जरी नाही फार काळ, तरी आठवणी हजार देऊन बसली.. कमावते झालो तेव्हा, मित्रच मित्र आस पास होते, वेळ मारून नेणाऱ्यांच्या गर्दीत, वेळेत येणारे काही खास होते... मागे पाहतो आज तेव्हा कळते, मित्र असे मी जोडलेच नाहीत, रक्ताची नाती नसताना माझे असलेले, असे मी कधी मोजलेच नाहीत... त्यांना सलाम करतो मी, जे सोबत अजूनही टिकून आहेत, मैत्रीचं नातं सांभाळणं, हे ते बरोबर शिकून आहेत... जोडताना काही नाती, त्यांची खात्री देता येत नाही, बेधुंद होऊन जग मित्रा, मागून काही मैत्री घेता येत नाही... #HappyFriendshipsDay #LongLiveFriendship - स्वप्नील हुद्दार #friends