Nojoto: Largest Storytelling Platform

#स्त्री.. स्त्री...स्वतंत्र असुनही सदा पारतंत्र्या

#स्त्री..
स्त्री...स्वतंत्र असुनही सदा
पारतंत्र्यात फुलणारे फुल तु या जगातले मुळशक्तीरूप स्त्री स्वरूप या जगी पातले
भावबंध रक्तबंध असे बंध हे सृजनमय रेशमी धुक्यातले
तुच लेवुनी हरक्षण अनेक रूपं भावदर्पणी तु माऊली जगात श्रेष्ठ तु श्रद्धासमर्पीणी
स्वामीनीही तुच जगाची तुझ्यामुळेच असती जिवंत श्वास हे आयुष्यातले
मुळशक्तीरूप स्त्री स्वरूप या जगी पातले
स्त्री...स्वतंत्र असुनही सदा पारतंत्र्यात फुलणारे फुल तु या जगातले......
माय कन्यका बहीण हे तीन भाव साजिरे काळजात स्थान असे विश्वमोहीनीस
असेच दिव्यरूप तुझे ते गोजीरे स्फूर्तीदायीनी तु प्रचंड गुढ या विश्वातले

ब्रम्हदेवही शोधी जे मनी ठायी तुझीया ते वसे आजही तयास हेच लागले वेड पिसे फार असे
मी बापुडा मजही न कळे गुज तुझ्या अंतरातले

दोन पावलात चंद्रलोके पावलीस तु अर्धपावली नभातही झेप घेऊनी
तुझी किर्ती जगी दावलीस तु वाटतेस या जगा तु जे वसे सुखांतक्षण तुझ्या अंतरातले

दुःख अंतरात दाबुनी ठेवी सुहास्य आननावरी तु जानकीसम होई धरेत लुप्त
होऊनी तृप्त नव्यानं वसे काननावरी तु हुंकारूनी मारीसी तु चंड मुंड या जगी जे मातले

पूर्ण तु अपुर्णता न स्पर्शते तुजला कधी संस्कृती सलज्जता सुशील तु विनम्र कधी
देन्य जाळण्या घेई तेज तु स्वतःच्या अंतरातले

@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #स्त्री