Nojoto: Largest Storytelling Platform

ना आता पर्यंत हरलो आम्ही ना मागे कधी फिरलो आम्ही प

ना आता पर्यंत हरलो आम्ही
ना मागे कधी फिरलो आम्ही
प्रत्येकासाठी मनापासून 
कर्तव्यावर झुरलो आम्ही 

आमच्यासाठी कर्तव्य महान आहे 
आम्हालाही भूक आहे तहान आहे 
तरीही लढतोय आम्ही संकटाशी
त्यात जीवही आमचा गहाण आहे 

या संकटाशी लढतोय आम्ही 
मनापासून साऱ्याशी  भिडतोय आम्ही 
लढत  अन् रडत का होईना 
यशाची हळु हळु पायरी चाढतोय आम्ही

तुम्ही घरी बसून दिलेली साथ हवीय
लख्ख प्रकाशात उजळलेली रात हवीय
केव्हा तरी नक्कीच संपेल सर्व पण,
 माणुसकीने माणसावर मिळवलेली मात हवीय ...
                                      -अ. वि.मुंढे #dedicated to doctor's and medical staff
ना आता पर्यंत हरलो आम्ही
ना मागे कधी फिरलो आम्ही
प्रत्येकासाठी मनापासून 
कर्तव्यावर झुरलो आम्ही 

आमच्यासाठी कर्तव्य महान आहे 
आम्हालाही भूक आहे तहान आहे 
तरीही लढतोय आम्ही संकटाशी
त्यात जीवही आमचा गहाण आहे 

या संकटाशी लढतोय आम्ही 
मनापासून साऱ्याशी  भिडतोय आम्ही 
लढत  अन् रडत का होईना 
यशाची हळु हळु पायरी चाढतोय आम्ही

तुम्ही घरी बसून दिलेली साथ हवीय
लख्ख प्रकाशात उजळलेली रात हवीय
केव्हा तरी नक्कीच संपेल सर्व पण,
 माणुसकीने माणसावर मिळवलेली मात हवीय ...
                                      -अ. वि.मुंढे #dedicated to doctor's and medical staff