Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6177094270
  • 21Stories
  • 10Followers
  • 136Love
    0Views

अ. वी.मुंढे

  • Popular
  • Latest
  • Video
a49e1481d24efd2461abf1c42492973d

अ. वी.मुंढे

रात्रीस त्या ताऱ्यांचे नांदणे,
बघ लाजून चूर झाले चांदणे..

रातराणीचे ते सुगंधास बांधणे,
की गेले हळूच माझ्या जवळून चांदणे..

उगाच काजव्यांचे रात्रभर रांधणे,
की मौनात आज गेले  बरसून चांदणे...

तोडूनी सारे उन्हाची बंधने,
 ह्रुदयात ठेवले मी लपवून चांदणे..

©अ. वी.मुंढे
a49e1481d24efd2461abf1c42492973d

अ. वी.मुंढे

मला पाहूनही शोधण्याचे बहाणे,
 वेड्यासारखे माझ्यासवे वहाणे !
 उगाचा लपंडाव ठाऊक तुजला,
 प्रेमात वेडे होती शहाणे !

हो तुला पाहण्याचा बहाणा हवा, 
सालस तुझ्या झलकेचा तराना हवा ! 
शहाणे असतील लाखो प्रेमात, 
एक वेडा तुझ्या प्रेमात दिवाना हवा!...

©अ. वी.मुंढे #MusicLove
a49e1481d24efd2461abf1c42492973d

अ. वी.मुंढे

गतवर्षाची रात्र आजची
बघ  अलगद आता सरेल ...
जपलेले साठवणीतले क्षण
आज या मनी आठवणीत उरेल...

येईल कोरे वर्ष घेऊनी
नवं चैतन्याची वाट ...
अन येईल घेऊनी सुखसमृद्धीची
चाहूल नवं वर्षाची  ती पहाट...

मी हि असेल माझ्यात
तू हि  असेल तुझ्यातली...
सर्रकन सरेल वर्ष सारे
पण प्रीत बहरेल आपल्यातली ....

©अ. वी.मुंढे new year


#HappyNewYear
a49e1481d24efd2461abf1c42492973d

अ. वी.मुंढे

दुखाच डोंगरही होईल पार
आधी चढूया तरी
आलोच आहोत खिंडीत
तर लढूया तरी      

अडथळे पार करत
हसत हसत जगूया तरी
आयुष्य देतेच धोका
पण जगुन बघुया तरी   

जाऊन जाऊन जाईल कोठे  
तो सुखांचा थवा
सारं आभाळ पिंजून होईल  
चल आपण निघुया तरी

©अ. वी.मुंढे
a49e1481d24efd2461abf1c42492973d

अ. वी.मुंढे

मंदिर बंद झाली 
अन् देव बाहेर पडला...
या नास्तिकाचाही बघ
विश्वास देवावर जडला...

देव नसतो अस म्हणत होतो 
पण काल मी ही देव पहिला...
या बंदितही त्याने माझ्या
अंगणातील केर वाहिला...

काल दावाखण्यात ही गेलो 
तिथे ही तू ठाकलेला...
शेंदुराने नव्हे तर 
चक्क PPE KIT ने झाकलेला...

परतत असतानाही पाहिलं चौकात
तिथेही तू उभा उन्हाचे चटके झेलून...
रुबाबदार दिसत होतास बघ 
ती खाकी कपडे घालून ...

राजकारण्यांच्या राजकारणात 
सोहळा मात्र तुझा राहिला ..
परंतु काल मी माझा देव 
साऱ्या माणसांत पहिला....

©अ. वी.मुंढे #Motivation
a49e1481d24efd2461abf1c42492973d

अ. वी.मुंढे

चांदण्यांच्या मैफिलीत
तू चंद्र म्हणून बहरावं
शांत त्या सागर किनारी
बसून मी तुझ्यात हरवाव..

सहवास तुझा तो न्याराचं
अन् वेगळी ही चांदरात
त्यात वारा हा छळवादी
अन् त्यात तू भरलेला पारिजात
 
मनी भाव हा तुझा
अन् बघ तुटणारा तो तारा
मनमोहक हे सारे
आणि त्यात गुलाबी हा वारा

पहिल्यांदाच अंधाऱ्या रातीत
एवढा दंगलेलो मी
झोपमोड होताच कळले
वेड्या स्वप्नांत  रंगलेलो मी

©अ. वी.मुंढे love,dream
#meltingdown

love,dream #meltingdown

a49e1481d24efd2461abf1c42492973d

अ. वी.मुंढे

मेरे हक की दलीलें फिजूल है
मेरा गवाह गवाई देने से मुकर गया है...
अब तो अपनाही कोई
मेरे दुश्मनी पे उतर गया है....

अदालतें सजी है तेरी मोहलेमे
गंवाए मेरे मोहलेसे हो तो अच्छा रहेगा...
मुझपे तोहल्लमे है तेरी गल्ली से गुजरने की 
रस्ता तेरे बाजार का बताए जाए तो अच्छा रहेगा....

ए शराब मुझे मीठी लगती है
और बताओ जहर पीना कैसा रहेगा 
पल भर के लिए मुझे सालो आजमाया
अब तुम ही बताओ ए जीना कैसा रहेगा 

मेरी फांसी मुकरर होने पे 
कोई बहुत मुस्कुरा गया है .....
जीने कि चाहत भी ना थी 
कोई हक़ में फैंसला कर गया है .....

©अ. वी.मुंढे #emptystreets
a49e1481d24efd2461abf1c42492973d

अ. वी.मुंढे

ही रात चांदण्यांची
मज घालते भुरळ ..
तुटणारा तारा सांगतो 
ही वाट नाही सरळ ...

सागराच्या त्या लाटा
अतृप्त त्या किनाऱ्याशी भेटूनही..
तिकडे दूर क्षितिज ही दिसेनासे
त्या आकाशाला खेटूनही..

आसमंत बेधुंद करी रातराणी
पण तीच आयुष्य क्षणांचच..
हे सारं काही भुलवणार
तरीही राज्य मात्र वेड्या मनांचच..

©अ. वी.मुंढे #moonlight
a49e1481d24efd2461abf1c42492973d

अ. वी.मुंढे

शोधतो देव मी दगडात 
मनी भाव नसताना ...
मज कुठे ठावूक,किती
यातना झाल्या घाव सोसताना..

माणसांच्या या गर्दीत
माणूसकीचीच ठेव नाही ..
दगडांच्या या गर्दीत 
सारेच देव नाही ...

तरीही त्याच दगडांशी
संवाद साधतो मी ...
गर्दीत या माणसांच्या
माणूस शोधतो मी... #leaf
a49e1481d24efd2461abf1c42492973d

अ. वी.मुंढे

उन्हाच्या त्या  झळांनी जळालेला
त्याला चटक्यांची भीती वाटत नाही..
त्याने हजार हुंदके गिळलेले
त्याचा कंठ ही आता दाटत नाही ...

त्याने हजार संकटे पेललेली
तरी त्याच्या डोक्यावर ताज आहे ..
तो कधी कोसळून रडत नाही
त्याच्या अश्रूनांही माज आहे...

घरचा कर्ता म्हणून 
 जबाबदाऱ्यांचा त्याला शाप आहे ..
देवून मज गर्द सावली
उन्हात उभा तो माझा बाप आहे ...
                 - अ.वी. मुंढे #FathersDay
loader
Home
Explore
Events
Notification
Profile