कविता__________________________________ 📖 जीवनप्रवास ________...✍️ कवि_ ध - वि . गोपतवार नात्यांचं वाहन चालण्यासाठी संवादाचं इंधन लागतं..... सुरळीत असाच चालत राहण्यासाठी मनाचं सर्विसिंग करावा लागतो.... नात्यांचं इंजिन धूर सोडायल लागले की शब्दांचा ऑईल बदलावा लागतो .... नात्यांचं वाहन सुरळीत चालण्यासाठी संवादाचं इंधन भरत राहावं लागतं..... भाष्य करण्यासाठी कंठाचा आवेग असतो 180 चा पण त्याला कंट्रोल मध्ये ठेवावा लागतो.... थोडं स्पीड वाढविला की व्यक्ती दुखावू शकतो याचा भान ठेवावा लागतो " पुढे वळण आहे वाहन सावकाश चालवा " अस मनाला सांगावा लागतो..... नात्यांचं वाहन चालविण्यासाठी मनाचं सर्व्हिसिंग करत राहावं लागतो.. हा वाहन संवादाविन चालत नसतो.... नात्यांचं वाहन चालण्यासाठी संवादाचं इंधन टाकत रहावा लागतो.... शब्दांचा आवेग वाढू लागला की , भावनेचा ब्रेक द्यावा लागतो नात्यांचं वाहन सावकाश चालवून समतोल साधावा लागतो... आयुष्यातील वळणे सांगतात " मानाचा ब्रेक उत्तम असतो " प्रत्येक वळणावर " वाहन सावकाश चालवा " फलक दिसतो.... हा वाहन चालवताना घरातील जेष्टांकडून त्यांच्या अनुभवाचं अभ्यास करावा लागतो.... जीवनाच्या रस्त्यात कोणती वळणे येतात कुठे ब्रेक आणि सावकाश चालवावा वेग किती असावा याचा अभ्यास एकदा का झालं हा वाहन चालविण्याचा license आपल्याला मिळतो ... मग आपण आयुष्याचा प्रवास करताना हा अनुभवांचा परवाना नेहमी सोबत ठेवावा लागतो.... घरातून बाहेर पडले की कुठे कोणता स्वयंघोषित चतुर ट्रॅफिक हवलदार कोणत्या वळणावर उभा असतो सांगता येत नाही... बाहेर पडले की traffic police मुखवटे घालून फिरत असतात आणि तो licence कधी मागतो सांगता येत नाही ... म्हणून license सोबत घ्यावा लागतो नात्यांचं वाहन सावकाश चालवावा लागतो..... नात्यांचं वाहन चालवण्यासाठी सोबतच संवादाचं इंधन देखील आवश्यक असतो विनाकारण त्या हवालदार ल लाच देत फिरण्यापेक्षा एकदा अभ्यास करून परीक्षा पास होऊन नात्यांचं वाहन चालविण्याचा परवाना मिळविले तर अतिउत्तम असतो .... नात्यांचं प्रवासात टप्या-टप्या वर एक नात्यांचं इंधन भरणा केंद्र असल तर खूपच बरे असते .... जिथे आपण थाबून संवाद साधून नात्यांच्या वाहनात इंधन भरणे सोपे होते.... नात्यांचं वाहन चालवीत असताना संवादाचं इंधन पाहिजे असतं.... जीवनाच्या प्रवासात नात्यांचं वाहन आवश्यक असतो आणि हा वाहन चालिविण्यासाठी संवादाचं इंधन भरत रहावा लागतो.... वाहन चालविण्यासाठी इंधन अवश्यकच असतो संवाद साधून वाहन सावकाश चालवावा लागतो नात्यांचं वाहन चालवताना शब्दांच्या वेगाचा तोल सांभाळावा लागतो .... नात्यांचा प्रवास सुखाचा चालत राहण्यासाठी जेष्ठाकडून ... " आपला प्रवास सुखाचा चालो " असा आशीर्वाद घ्यावा लागतो हा प्रवास असाच चालत राहण्यासाठी संवादाचं इंधन भरत राहावं लागतो...... लेखक :: कवी मन _ मनातलं ओझं पानावर कवी ::. धर्मेंद्र वि . गोपतवार ©Dharmendra Gopatwar #जीवनप्रवास