Unsplash #कधी कधी.... शब्दवेडा किशोर कधी कधी.. बेभान जगावं एकांतात मनमुराद हसावं एकांतात मोकळेपणानं रडावं एकांतात स्वतःला पूर्णपणे सावरावं एकांतात आसवांना आवरावं एकांतात स्वतःला ओळखावं एकांतात दुखावलेल्या जुन्या नव्या जखमांचा सारा हिशोब सुद्धा मांडावा एकांतात स्वतःच्या आयुष्याचं पुस्तक लिहावं एकांतात स्वतःला जगवावं एकांतात नवी स्वप्नं पाहून बघावी एकांतात आयुष्याचा सारीपाट खेळून बघावा एकांतात.. एक एकट्याचा एकट्यासाठीचा एकटा एकांत शिकवतो आपणास धडे आयुष्याचे....एकांतात.... कधी कधी.... ©शब्दवेडा किशोर #कधीतरीवाटते