White अजुनही पंचवीशीची आहे मी अजुनही पंचवीशीची आहे मी तरूण पणात दिसते तशी पंचवीशीची आहे मी ...... ताजी टवटवीत कांती माझी दिसते खुप सुदंर कारण ..... कारण अजुनही पंचवीशीची आहे मी ..... नाकी डोळी नीटसा बांधा लाल चुटूक ओठ माझे खुणावतात डाळींबाला हसतात विलग होऊनी ओठ जेव्हा फुलतो हास्याचा कारंजा पाण्यासारखा कारण... अजुनही पंचवीशीची आहे मी.... इकडे तिकडे बागडतांना लहान होऊन जाते भान नसते कशाचेच तेव्हा मस्त मजेत जगते असेच रहावे भरभरून जगावे आवडीचे एखादे गीत गावे कारण... कारण अजुनही पंचवीशीची आहे मी...... सगेसोयरे असले जवळ तरी आपण आपल्यातच रहावे कोणासही न दुखावता त्यांच्यातच असावे माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे असेच अपुले नाते असावे कारण.... कारण अजूनही पंचवीशीत आहे मी... सौ.रसिका चाळके. ©Rasika Chalke #good_night स्मृतीगंध