Nojoto: Largest Storytelling Platform
rasikachalke4015
  • 55Stories
  • 10Followers
  • 536Love
    135Views

Rasika Chalke

  • Popular
  • Latest
  • Video
6cfe57fcaf9355e6b09c6e5ef8c0581b

Rasika Chalke

हनुमान मंत्र  

नमो हनुमंते रूद्रावताराय 
सर्व शत्रुसंहरणाय 
रूद्रावताराय सर्व रोगहराय
सर्व वशीकरणाय रमदुताय.

©Rasika Chalke
  मंत्र

मंत्र #शिक्षण

126 Views

6cfe57fcaf9355e6b09c6e5ef8c0581b

Rasika Chalke

हरवलेले सुर माझे गवसले आता
तालावरती गात सुटावे
आपल्याच मस्तीत रहावे
मनाचे ऐकून सारे जे हवे तेच करावे
मन उधाण वाऱ्यासवे बागडते आता
निवांतात बसावे आणि
गावी आवडती गाणी
संवगड्यांसवे फीरून यावे
अन आपल्याच मस्तीत जगावे
खावे प्यावे छान रहावे 
दुसऱ्यांसाठी जगता जगता
स्वतःसाठी ही जगावे
स्वतःसाठी ही जगावे.....

                                               सौ.रसिका चाळके
                                                  स्मृतिगंध कविता संग्रह

©Rasika Chalke
  स्मृतिगंध कविता संग्रह

स्मृतिगंध कविता संग्रह #मराठीकविता

36 Views

6cfe57fcaf9355e6b09c6e5ef8c0581b

Rasika Chalke

कन्यारत्न 

माझ्या मुली माझा स्वाभिमान 
माझा आत्मविश्वास ,माझा श्वास
माझी भरारी त्या मुलींसाठी
जे माझे आहे ते त्यांच्यासाठी
त्याच्या हास्यात माझे हास्य
त्यांच्या भाग्यात माझे भाग्य
सुख दुःखात नेहमी एकत्र 
गुलाबाच्या पाकळी परी उमलणाऱ्या
ताजी टवटवीत दिसणाऱ्या माझ्या मुली
ओठांवरचे हास्य खुलवत पुढे पुढे जाणाऱ्या
जरा जवळ येना म्हणत मनातले गुपीत सांगणाऱ्या
यशाची शिखरे पार करत आनंदाने जगणाऱ्या माझ्या मुली.
शुभ दिनी जन्मूनी शुभ संध्याकाळ आणि रात्र साजरी झाली.

सौ.रसिका चाळके.
१४ / १२ / २०२२

©Rasika Chalke #roseday
6cfe57fcaf9355e6b09c6e5ef8c0581b

Rasika Chalke

पावसात तुझ्या सवे
नाही अडवले पावसाने मला
कितीही द्वाड असला
परी येई तो तुझ्या जवळ
तुला मला भिजवण्यासाठी
अल्लड वाराही साद घालतो तूला
तव बेभान होतेस तू भिजण्या पावसात
नसते भान तूवा तव ओठी गित गुणगुणत 
गिरकी घेतेस दोन हात पसरून
करून मुख आभाळाकडे पहातेस
तव पावसाचे पाणी ओघळते तुझ्या मुखावरी 
अन घरंगळत येते उरी
चिंब भिजलेली पावसात तू
पाहून मलाही येते हसू
वाढलेल्या वयानेही होतेस लहनगी
कागदाची करून नाव 
सोडतेस साचलेल्या पाण्यात ती
तव दाखवण्या ती नाव घेतेस माझा हात हाती
दाखवण्या ती नाव घेतेस माझा हात हाती......
अन भिजवतेस त्या पावसात मलाही
पावसातही तुझे असे वागणे मी पहाते
तव गाली हसू खेळते अन 
लाजून गोरीमोरी होतेस तू
लपवून चेहरा ओंजळीत पहातेस दोन बोटांमधूनी 
नजरेला ही नजर भिडते
अन दोघीहीच्याही जीवनी वरती 
हसू वाहते खळखळूनी......

सौ. रसिका चाळके शिर्के
आठवणी तुझ्या माझ्या
१३/६/२०२२

©Rasika Chalke कविता

7 Love

6cfe57fcaf9355e6b09c6e5ef8c0581b

Rasika Chalke

गढुळ झालेल पाणी स्वच्छ होण्यासाठी 
काही वेळ त्या पाण्याला तसेच ठेवावे लागते...
तेव्हाच गढुळ झालेल पाणी स्वच्छ होते...
तेव्हा आपण ठरवावे 
आपल्याला पाणी कसे हवे आहे

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ
सौ.रसिका चाळके.

©Rasika Chalke #Thoughts
6cfe57fcaf9355e6b09c6e5ef8c0581b

Rasika Chalke

गढुळ झालेल पाणी स्वच्छ होण्यासाठी 
काही वेळ त्या पाण्याला तसेच ठेवावे लागते...
तेव्हाच गढुळ झालेल पाणी स्वच्छ होते...
तेव्हा आपण ठरवावे 
आपल्याला पाणी कसे हवे आहे

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ
सौ.रसिका चाळके.

©Rasika Chalke माझे विचार

#OneSeason

माझे विचार #OneSeason #मराठीविचार

8 Love

6cfe57fcaf9355e6b09c6e5ef8c0581b

Rasika Chalke

१

 नाम स्वामींचे‌

मुखी नाम स्वामींचे 
सकाळ होताच ओठांवरती 
पहिले स्वामी नाम येते मुखी 
जेव्हा पाहते तुमच्याकडे मी
माझे वाईट विचार दूर जातात 
चांगले विचार मनी येती
आनंदाने सुरवात होते दिवसाची 
नित्य नियमाची कामे रोजचीच होत असतात
करता नाम जप स्वामी समर्थांचे 
मनास प्रसन्न वाटे.
कसलीच भिती ना उरते मनी 
मिटून जाते सारी चिंता
मग कशाची काळजी अन भय
आली संकटे जरी स्वामी च तारतात
तुम्ही सोबत असता कामेही झरझर होतात
पुढे जाण्याचा मार्ग तुम्हीच दाखवता 
तेव्हा येतात शब्द माझ्या कानी तुमचे
घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 
म्हणूनच रोज येते मुखी नाम स्वामींचे 
श्री स्वामी समर्थ , श्री स्वामी समर्थ, 
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, 
श्री स्वामी समर्थ  श्री स्वामी समर्थ .....

सौ. रसिका चाळके शिर्के

©Rasika Chalke #OneSeason
6cfe57fcaf9355e6b09c6e5ef8c0581b

Rasika Chalke

३

तव काय करावे सुचेनाच काही 
जलाशय समोर असताही 
पिण्यास पाणी नाही 
काय म्हणावे निसर्गाच्या या किमयेला
एका हाती काढून घेतो देतो दुसर्‍या हाती 
घेताना ही करतो डोळे ओले 
अन देतानाही आणतो डोळ्यात पाणी 
सांगावयास दुःख ना जवळ ठेवतो कुणी
पुरातल्या पाण्यामधली 
मानवाची ही कर्म कहाणी
माणसातल्या माणसासाठी
रडते आहे आतून काळीज 
काय बोलावे, काय सांगावे 
जे मरुन गेले, वाहून गेले पुराच्या पाण्यात 
आसवांच्या आठवणी तेवढ्या राहील्या स्मरणात 
आसवांच्या आठवणी तेवढ्या राहील्या स्मरणात...

सौ. रसिका चाळके

©Rasika Chalke # स्मृतिगंध #

#OneSeason

# स्मृतिगंध # OneSeason

10 Love

6cfe57fcaf9355e6b09c6e5ef8c0581b

Rasika Chalke

२

।।  कोसळणार्‍या पावसात ।।

कोसळणार्‍या पावसाच्या धारांनी
जलमय झाली सारी गावे आणि शहरे 
बुडून गेली घरे, देवळे, बाजार पेठा
अन साधन सामुग्री 
दरडी वरती डरडी कोसळल्या 
जखमी झाली माणसे काही मरून गेली
डीगार्याखाली गाडले गेले सारे उरले ना काही 
चिखलाने भरली दुकाने अन 
पाण्याखाली राहीली घरे 
चिखल सारा झाला चहुकडे 
बाई घरातला माणुस गेला कुणीकडे 
वाहून गेले  सारे काही पाण्यात 
काय करावे उरले ना काही हातात 
कसे रहावे, कसे जगावे कळेच ना काही 
सुन्न झाली काया सारी 
मदतीचे हात आले पुढे तरी 
कोणासाठी काय घ्यावे अन 
मिळालेले ही ठेवण्यासाठी जागाच ना उरली

                                                    क्रमक्ष

©Rasika Chalke #OneSeason
6cfe57fcaf9355e6b09c6e5ef8c0581b

Rasika Chalke

२
।।  कोसळणार्‍या पावसात ।।

कोसळणार्‍या पावसाच्या धारांनी
जलमय झाली सारी गावे आणि शहरे 
बुडून गेली घरे, देवळे, बाजार पेठा
अन साधन सामुग्री 
दरडी वरती डरडी कोसळल्या 
जखमी झाली माणसे काही मरून गेली
डीगार्याखाली गाडले गेले सारे उरले ना काही 
चिखलाने भरली दुकाने अन 
पाण्याखाली राहीली घरे 
चिखल सारा झाला चहुकडे 
बाई घरातला माणुस गेला कुणीकडे 
वाहून गेले  सारे काही पाण्यात 
काय करावे उरले ना काही हातात 
कसे रहावे, कसे जगावे कळेच ना काही 
सुन्न झाली काया सारी 
मदतीचे हात आले पुढे तरी 
कोणासाठी काय घ्यावे अन 
मिळालेले ही ठेवण्यासाठी जागाच ना उरली 
तव काय करावे सुचेनाच काही 
जलाशय समोर असताही पिण्यास पाणी नाही 
काय म्हणावे निसर्गाच्या या किमयेला
एका हाती काढून घेतो देतो दुसर्‍या हात
घेताना ही करतो डोळे ओले 
अन देतानाही आणतो डोळ्यात पाणी 
सांगावयास दुःख ना जवळ ठेवतो कुणी
पुरातल्या पाण्यामधली मानवाची ही कर्म कहाणी
माणसातल्या माणसासाठी रडते आहे आतून काळीज 
काय बोलावे, काय सांगावे 
जे मरुन गेले, वाहून गेले पुराच्या पाण्यात 
आसवांच्या आठवणी तेवढ्या राहील्या स्मरणात 
आसवांच्या आठवणी तेवढ्या राहील्या स्मरणात...

सौ. रसिका चाळके

©Rasika Chalke #OneSeason
loader
Home
Explore
Events
Notification
Profile