White ⚫ खरा व्हॅलेंटाईन – १४ फेब्रुवारी २०१९ ⚫ सगळीकडे पसरला होता लाल लाल रंग, समदं जग साजरा करत होता व्हॅलेंटाईन, इकडे मात्र लाल गळद रक्तानं, शौर्याने पेटून उठलाय भारताचा सैनिकवाइन... प्रेमाच्या गोड गोड वचनांना, तो फुलांचा साज चढवत होता, इथे मात्र रणभूमीवरती, माझा वीर रक्त सांडवत होता... कुणी प्रेमाच्या गोड शब्दांत, आपलं प्रेम व्यक्त करत होता, इथे मात्र या मातृभूमीसाठी, सैनिक स्वतःचं जीवन अर्पण करत होता... प्रियकर गुलाबाच्या नाजुक पाकळ्यांत, त्याच्या प्रेयसीचं नाव कोरत होता, इथे मात्र पेटत्या चितेवर पडून, एक वीर तिरंग्याशी गोंजारत होता... शत्रूने आत्मघाती धोका करून, पाठीतून त्यांनी वार केला होता, धरतीपुत्र वीरांनी मरण स्वीकारून, देशासाठी आज बलिदान दिला होता... स्वतःचं रक्त सांडवून या धरणी साठी, त्यांनी त्यांच्या प्रेमाचा नजराणा दिला होता, प्रेम म्हणजे त्याग, सन्मान आणि बलिदान, असा व्हॅलेंटाईन त्यांनी साजरा केला होता... सलाम त्या अमर शूरवीरांना कारण त्यांनीच दाखवलं, काय असतं खरं प्रेम, काय असतं खरं बलिदान! 🇮🇳 जय हिंद! 🇮🇳 ©मयुर लवटे #Thinking #BlackDay #India #Poetry #Nojoto poetry sad poetry