Nojoto: Largest Storytelling Platform

White शेवटचा मुक्काम सभोवती फुलांची आज आरास आहे

White शेवटचा मुक्काम 

सभोवती फुलांची आज आरास आहे 
सरणावरती उद्या हाच मधुमास आहे 
क्षणभंगुर जीवनाचा मग गर्व तरी कशाला 
देहाची सौंदर्याची शेवटी राख होणार आहे

सात्वणास रात्रीला कोरडे उसासे असतात 
वेळ झाली की प्रत्येकाला निघावे लागतात 
प्रतिबिंबात दिसते आकृती छान आहे 
मागे उरतो फक्त आठवणीचा बाजार आहे 

तोडल्यावर फुलं ताजेतवाने राहत नाही 
वार्धक्य तसेच कधी कोणाला सोडत नाही 
जगून घ्यावा इथला प्रत्येक प्रेमळ क्षण 
याच जन्मातला आपला हा शेवटचा मुक्काम आहे

©Tushar pagar #Thinking
White शेवटचा मुक्काम 

सभोवती फुलांची आज आरास आहे 
सरणावरती उद्या हाच मधुमास आहे 
क्षणभंगुर जीवनाचा मग गर्व तरी कशाला 
देहाची सौंदर्याची शेवटी राख होणार आहे

सात्वणास रात्रीला कोरडे उसासे असतात 
वेळ झाली की प्रत्येकाला निघावे लागतात 
प्रतिबिंबात दिसते आकृती छान आहे 
मागे उरतो फक्त आठवणीचा बाजार आहे 

तोडल्यावर फुलं ताजेतवाने राहत नाही 
वार्धक्य तसेच कधी कोणाला सोडत नाही 
जगून घ्यावा इथला प्रत्येक प्रेमळ क्षण 
याच जन्मातला आपला हा शेवटचा मुक्काम आहे

©Tushar pagar #Thinking
tsharpagar5999

Tushar pagar

New Creator