White शेवटचा मुक्काम सभोवती फुलांची आज आरास आहे सरणावरती उद्या हाच मधुमास आहे क्षणभंगुर जीवनाचा मग गर्व तरी कशाला देहाची सौंदर्याची शेवटी राख होणार आहे सात्वणास रात्रीला कोरडे उसासे असतात वेळ झाली की प्रत्येकाला निघावे लागतात प्रतिबिंबात दिसते आकृती छान आहे मागे उरतो फक्त आठवणीचा बाजार आहे तोडल्यावर फुलं ताजेतवाने राहत नाही वार्धक्य तसेच कधी कोणाला सोडत नाही जगून घ्यावा इथला प्रत्येक प्रेमळ क्षण याच जन्मातला आपला हा शेवटचा मुक्काम आहे ©Tushar pagar #Thinking