Nojoto: Largest Storytelling Platform

पाखरांची शाळा पुन्हा भरली आठवणी घेऊन सर्व परतली.


पाखरांची शाळा पुन्हा भरली
आठवणी घेऊन सर्व परतली.
सुख, दुःखांच्या आठवणीचा ठेवा
घेऊन पाखरं जुन्या गप्पात बुडाली.

संसाराच्या चक्रव्यूहात अडकलेली
पाखरं आज मनमोकळं करतील.
एकमेकांना आधार देऊन पुन्हा
उभारी घेण्यासाठी बळ देतील.

पाखरांनी कितीही उंच भरारी घेतली
तरी आठवणीतली शाळा काही सुटत नाही.
शाळेतली मौज- मज्जा, निर्भेळ मैत्री
व्यावहारिक जगात कुठेच सापडत नाही.

सोशियल मीडिया वर भेटणारी
मित्र- मंडळी आज प्रत्यक्षात भेटली
रोजच्या व्यापातले जगणे विसरून
 भूतकाळातील भावविश्वात पुन्हा रमली.

गेलेले क्षण पुन्हा जगण्याची संधी
स्नेह मेळाव्या निमित्ताने चालून आली
बालपणात जाऊन येण्याची
संधी आज प्रत्येकाला मिळाली.

पाखरांनो, चालती-बोलती
माणसं अचानक नाहीशी होतात;
म्हणून माणसं जपली पाहिजेत
आनंदाचा, आपल्या असण्याचा 
हा स्नेहमेळावा वर्षातून
एकदातरी भरवला पाहिजे.







 पाखरांची शाळा पुन्हा भरली.

पाखरांची शाळा पुन्हा भरली
आठवणी घेऊन सर्व परतली.
सुख, दुःखांच्या आठवणीचा ठेवा
घेऊन पाखरं जुन्या गप्पात बुडाली.

संसाराच्या चक्रव्यूहात अडकलेली
पाखरं आज मनमोकळं करतील.
एकमेकांना आधार देऊन पुन्हा
उभारी घेण्यासाठी बळ देतील.

पाखरांनी कितीही उंच भरारी घेतली
तरी आठवणीतली शाळा काही सुटत नाही.
शाळेतली मौज- मज्जा, निर्भेळ मैत्री
व्यावहारिक जगात कुठेच सापडत नाही.

सोशियल मीडिया वर भेटणारी
मित्र- मंडळी आज प्रत्यक्षात भेटली
रोजच्या व्यापातले जगणे विसरून
 भूतकाळातील भावविश्वात पुन्हा रमली.

गेलेले क्षण पुन्हा जगण्याची संधी
स्नेह मेळाव्या निमित्ताने चालून आली
बालपणात जाऊन येण्याची
संधी आज प्रत्येकाला मिळाली.

पाखरांनो, चालती-बोलती
माणसं अचानक नाहीशी होतात;
म्हणून माणसं जपली पाहिजेत
आनंदाचा, आपल्या असण्याचा 
हा स्नेहमेळावा वर्षातून
एकदातरी भरवला पाहिजे.







 पाखरांची शाळा पुन्हा भरली.

पाखरांची शाळा पुन्हा भरली.