Nojoto: Largest Storytelling Platform

मित्रांनो धीर सोडू नका! परिस्थिती कितीही गंभीर असल

मित्रांनो धीर सोडू नका!
परिस्थिती कितीही गंभीर असली तरी
जगण्याची उमेद हारू नका.
स्वकीयांच्या जाण्याने भयभीत झाला तरी
 मित्रांनो धीर सोडू नका!
               कठीण काळात तग धरून राहण्यासाठी
               नकारात्मक विचारांना थारा नको.
              आजची काळरात्र उद्या नक्कीच नसेल म्हणून
              मित्रांनो धीर सोडू नका!
समोर कितीही काळोख असला तरी
माघार घेऊ नका.
प्रकाशाची आस धरून शेवटपर्यंत
लढायचे आहे हे ही विसरू नका.
               परिस्थिती तुमचा कस पाहीन;
                तिला शरण जाऊ नका.
                लढण्यासाठी जन्म आपुला
                 मित्रांनो धीर सोडू नका.
वेढले जरी संकटांनी
भयभीत होऊ नका.
नक्कीच निघेल मार्ग यातून
मित्रांनो धीर सोडू नका.
                 आपल्याबरोबर कुटुंबाचीही काळजी घेऊन
                 शत्रुला संक्रमणाची संधी देऊ नका.
                 शरीराने खचला तरी मनाने उभारी घ्या.
                हीच विनंती, मित्रांनो धीर सोडू नका!
 #मित्रांनो धीर सोडू नका!
मित्रांनो धीर सोडू नका!
परिस्थिती कितीही गंभीर असली तरी
जगण्याची उमेद हारू नका.
स्वकीयांच्या जाण्याने भयभीत झाला तरी
 मित्रांनो धीर सोडू नका!
               कठीण काळात तग धरून राहण्यासाठी
               नकारात्मक विचारांना थारा नको.
              आजची काळरात्र उद्या नक्कीच नसेल म्हणून
              मित्रांनो धीर सोडू नका!
समोर कितीही काळोख असला तरी
माघार घेऊ नका.
प्रकाशाची आस धरून शेवटपर्यंत
लढायचे आहे हे ही विसरू नका.
               परिस्थिती तुमचा कस पाहीन;
                तिला शरण जाऊ नका.
                लढण्यासाठी जन्म आपुला
                 मित्रांनो धीर सोडू नका.
वेढले जरी संकटांनी
भयभीत होऊ नका.
नक्कीच निघेल मार्ग यातून
मित्रांनो धीर सोडू नका.
                 आपल्याबरोबर कुटुंबाचीही काळजी घेऊन
                 शत्रुला संक्रमणाची संधी देऊ नका.
                 शरीराने खचला तरी मनाने उभारी घ्या.
                हीच विनंती, मित्रांनो धीर सोडू नका!
 #मित्रांनो धीर सोडू नका!