Nojoto: Largest Storytelling Platform

अवकाळी अवकाळी तो बरसून गेला पडझड करून गेला घराची

अवकाळी
अवकाळी तो बरसून गेला  पडझड करून गेला  घराची
आणि मनाचीही...

आला आणि मागे खुणा सोडून गेला
त्याच्यामुळे शेवाळे लागले भिंतीला आणि भावनेलाही ....

कोणी म्हणे निसर्ग कोपला,
कोणी म्हणे माणूस चुकला,
अवकाळी चा फटका कोवळ्या फुलांस बसला आणि मुलांसही...

अवकाळी गवताची पाती वाकली आणि शेतीभातीही ,
पिके नासली आणि माणुसकीही ....

घराची आणि भिंतींची डागडुजी होईल पण मनाचे काय...? 
पीक उभं राहील आणि सुगी येईल पण अवकाळी ने झोडपलेल्या माणुसकीचे पीक  तग धरेल काय...?

म्हणून येताना काळ वेळ बघून ये ,
अवकाळी बरसू नको...

काळ वेळ बघून येण्याला प्रकृती म्हणतात आणि अवकाळी येण्याला विकृती...

प्रकृती आणि विकृतीचे द्वंद्व अनादी काळापासून संपेना,
सुकाळ आणि अवकाळाचे चक्र मिटता मिटेना....

# Pournima Mohol
16-05-2024
7:00a.m.
Copyrites reserved

©Pournima Mohol
  #Barsaat

#Barsaat #Poetry

12,807 Views