Nojoto: Largest Storytelling Platform
pournimamohol1872
  • 39Stories
  • 28Followers
  • 546Love
    19.7KViews

Pournima Mohol

Teacher,poetess writer

  • Popular
  • Latest
  • Video
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol


अवकाळी
अवकाळी तो बरसून गेला  पडझड करून गेला  घराची
आणि मनाचीही...

आला आणि मागे खुणा सोडून गेला
त्याच्यामुळे शेवाळे लागले भिंतीला आणि भावनेलाही ....

कोणी म्हणे निसर्ग कोपला,
कोणी म्हणे माणूस चुकला,
अवकाळी चा फटका कोवळ्या फुलांस बसला आणि मुलांसही...

अवकाळीच खोपटात पाणी शिरले
अन् डोळ्यांतून वाहू लागले,
अवकाळी गवताची पाती वाकली आणि शेतीभातीही ,
पिके नासली आणि माणुसकीही ....


घराची आणि भिंतींची डागडुजी होईल पण मनाचे काय...? 
पीक उभं राहील आणि सुगी येईल पण अवकाळी ने झोडपलेल्या माणुसकीचे पीक  तग धरेल काय...?

म्हणून येताना काळ वेळ बघून ये ,
अवकाळी बरसू नको...

काळ वेळ बघून येण्याला प्रकृती म्हणतात आणि अवकाळी येण्याला विकृती...

प्रकृती आणि विकृतीचे द्वंद्व अनादी काळापासून संपेना,
सुकाळ आणि अवकाळाचे चक्र मिटता मिटेना....

# Pournima Mohol
16-05-2024
7:00a.m.
Copyrites reserved

©Pournima Mohol
  #Barsaat
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

अवकाळी
अवकाळी तो बरसून गेला  पडझड करून गेला  घराची
आणि मनाचीही...

आला आणि मागे खुणा सोडून गेला
त्याच्यामुळे शेवाळे लागले भिंतीला आणि भावनेलाही ....

कोणी म्हणे निसर्ग कोपला,
कोणी म्हणे माणूस चुकला,
अवकाळी चा फटका कोवळ्या फुलांस बसला आणि मुलांसही...

अवकाळी गवताची पाती वाकली आणि शेतीभातीही ,
पिके नासली आणि माणुसकीही ....

घराची आणि भिंतींची डागडुजी होईल पण मनाचे काय...? 
पीक उभं राहील आणि सुगी येईल पण अवकाळी ने झोडपलेल्या माणुसकीचे पीक  तग धरेल काय...?

म्हणून येताना काळ वेळ बघून ये ,
अवकाळी बरसू नको...

काळ वेळ बघून येण्याला प्रकृती म्हणतात आणि अवकाळी येण्याला विकृती...

प्रकृती आणि विकृतीचे द्वंद्व अनादी काळापासून संपेना,
सुकाळ आणि अवकाळाचे चक्र मिटता मिटेना....

# Pournima Mohol
16-05-2024
7:00a.m.
Copyrites reserved

©Pournima Mohol
  #Barsaat
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

Dear December,

Wearing the crown of the
show stopper of the year,
Bidding a farewell with smile and tear,
There you come with shiver and quiver...

With the bells ringing in the churches and the chapel,
the gifts of  the Santa and the prayers of the Raphael...

With the Christmas tree of Bethlehem,
Mother Mary and Jesus Christ
Come Lord Amen .. 
 
With the building of a snowman 
wiping the sins of the whole year, dear December sliding in the sleigh of reindeers we could hear 
the jingle of the New year... 

# Pournima Mohol
25-12-2023

Merry Christmas and Happy New year

©Pournima Mohol
  #christmascelebration
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

Eternal Lullaby

Soothing breeze 
and silent nights
forgotten lulls come to my mind...

That childhood peace
Life at ease
Those lullabies sung
Sound sleep and dreams... 

Now I could feel rough rattling storm
Frozen lullabies
and voices harsh... 

Now my  luxurious couch pricks me
and dream comes rare, 
for now the childhood fairy tales have shaped up to 
night mare...

Time has fleeted
Lulls forgotten
yet chants in my mind
that Lullaby eternal... 

That motherly Lullaby eternal.... 

#Pournimas
Poetry
From Pournimas desk 29-11-2023

©Pournima Mohol
  #onenight
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

तमाचा अंधार, 
षड्रिपूंचे वादळ, 
तशात माझी 
जीवन नौका ,
हेलकावणे अटळ...
वाऱ्या सम 
वेग मनाचा
आवरता आवरेना,
देवालयातला देव 
मज कुठे दिसेना...
मनाची होता 
गुंता गुंत ,
आठवले मज संत,
तुका,सावता,गोरा,चोखा अन् ज्ञानिया सारखे महंत ...           
 सत्व गुणांचे मग मेघ दाटले ,
काम ,क्रोध वाहून गेले,
लोभ ,मोह,मद,
मत्सर मातीत निमाले...
मज आता दिसू लागले ज्ञानाचे स्वयं प्रकाशित किरण,
सत्वाने स्वत्व शमले
चढले स्थितप्रज्ञतेचे स्फुरण...
 #Pournima Mohol 
21-08-2023
12:20 a.m

©Pournima Mohol
  #ChaltiHawaa
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol


जेव्हा शब्द मुके होतात 
तेव्हा लेखणीही थांबते
डोळ्यातून व्यक्त होताच
लेखणीतील ओळ थेंब झेलते...
मुक्याच भावना साऱ्या 
व्यक्त होतात मुक्याने
पाट वाहतात मग 
मनातील अबोल ओझ्याने...
  नयन वाचून 
 अंतरंग मी लिहीत जाते
नीरव शांततेत स्वतःला ओळखत जाते
मनाशी मनाचा संवाद करत जाते...
मुक्या झालेल्या शब्दांना मग मनात येतो महापूर
झरा वाहतो मग शब्दांचा 
पण ओठांवर असते तरीही 
एक अबोल धून...

एक अबोल धून
जेव्हा शब्द मुके होतात......
#Pournima Mohol
11-06-2023.
04:00p.m.

©Pournima Mohol
  #merikHushi
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

कधी कधी वाटतं एकांतात बसावं,
निसर्गात रमावं,
स्वतःशीच हितगुज करावं,
लोक परिक्षण करणाऱ्या लोकांमध्ये राहून आपण मात्र स्वतःचं आत्मपरीक्षण  करावे...
चढा- ओढ ,
हेवे - दवे,
रुसवे - फुगवे ही तर 
जगरहाटीच आहे
आपण मात्र त्यापलीकडे एक वेगळं जग निर्माण करावं...
स्वतःतला स्व बाजूला ठेऊन स्वतःला ओळखावं,
मनाला प्रेम आणि सौहार्दपूर्ण शांततेने सजवावे...
निसर्गात रमताना अहंकाराची पानगळ होताना पहावं,
कधी कधी वाटतं स्वतःशीच हितगुज करावं आणि हितगुज करताना अध्यात्मात स्व समर्पण करावं...
#Pournima
Mohol
Written on 27-05-2023 at 7.30 p.m.

©Pournima Mohol
  #walkalone
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

नभातली चांदणी धरतीवर अवतरली
शुभ्र साज अन् सुगंध लेऊन आली
रातराणी अंगणी फुलली...
तिच्या बहरण्याने मनी प्रेमभावना उमलली
सख्या तुझ्या आठवणीने सखी लाजून भिजली
रातराणी अंगणी फुलली...
मनाच्या मिट्ट काळोखात अवचित चांदणी लुकलुकली
प्रेम अन् अध्यात्माची घट्ट वीण पडली
 रातराणी अंगणी फुलली...
तिच्या फुळण्याने
अंगणी माझ्या रुख्मिणी संसार रस प्राशली
राधा श्रृंगार रस ल्याली
अन् मीरा भक्ति रसात न्हाली
 रातराणी अंगणी फुलली...
सख्या तुझ्या आठवणीने सखी व्याकुळ झाली
ओढ प्रितीची ओढ भक्तीची आज एकसंग झाली
रातराणी अंगणी फुलली...

#Pournima Mohol
17-05-2023

©Pournima Mohol
  #Hum
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

 आयुष्याच्या कातरवेळी 
अध्यात्माची कास धरावी
जीवन मोहाचे धागे
अध्यात्माने त्याची गुंत्वळ सुटावी

राहिलो आसक्त जन्मभर
इच्छांच्या तळाशी न संपणारी
इच्छाच मिळाली...

जगलो तुलनात्मक आयुष्य
तुलनांच्या अंताशी न संपणारी
तुलनाच मिळाली...

 सुखावलो भौतिक सुखात
सुखांच्या शेवटी न संपणारी
लालसा मिळाली...

आता या कातरवेळी मात्र
झालो अशाश्वताने गलितगात्र
शाश्वत अध्यात्माने उजळून जावी
आयुष्याची रात्र...

आयुष्याच्या कातरवेळी
वैचारिक प्रगल्भतेची पहाट व्हावी
जीवन मोहाचे धागे
अध्यात्माने त्याची गुंत्वळ सुटावी...

©Pournima Mohol
  #walkingalone
c3ea856754ba53e55b1b33c85c129fe4

Pournima Mohol

आयुष्याच्या कातरवेळी
अध्यात्माची कास धरावी,

जीवन मोहाचे धागे
अध्यात्माने त्याची गुंत्वळ सुटावी...

राहिलो आसक्त जन्मभर
इच्छांच्या तळाशी न संपणारी 
इच्छाच मिळाली...

भौतिक सुखांची अमाप प्राप्ती
तरीही न भरणारी ओंजळ
रितीच राहिली...

वठलेल्या वृक्षास आता
अध्यात्माची पालवी  फुटावी
झालेल्या पान गळीला
आसमंतात भरारी मिळावी

अन् आयुष्याच्या कातरवेळी
वैचारिक सुख समाधानाची नांदी लाभावी

©Pournima Mohol
  #walkingalone
loader
Home
Explore
Events
Notification
Profile