White *एक वॅलेनटाईन असा...* तिचा तो गुलाब नको मला तिचा होकार सुद्धा नको मला, एकटाच सुखी आहे आयुष्यात. तिच्या खोट्या प्रेमाची भीक नको मला... तिचा चॉकलेट - रुपी मोह नको मला तिच्या स्वार्थी प्रशंसा सुद्धा नको मला, स्वतःच विकत घेऊ शकतो सगळंच. तिचे बिनकामाचे ते बाहुले नको मला... तिचे आणा - भाका देणे नको मला तिचे साथ देणे सुद्धा नको मला, मी मलाच साथ देईन सदैव. तिच्या ओठांचा स्पर्श नको मला... तिच्या सोबतीची मिठी नको मला तिच्या संगतीचा सहवास सुद्धा नको मला, स्वतःच स्वतःच्या कुशीत झोप घेईन. तिची प्रेम स्वप्ने नको मला... तिची आठवण परत नको मला तिची मनात साठवण सुद्धा नको मला, एकटाच माझं आयुष्य पणाला नेईन. तिचा अर्ध्यावरचा साथ नको मला... काव्यांकुर तो _मयुर सं. लवटे आर्वी वर्धा, महाराष्ट्र मो. नं.:- 7028426669 ©मयुर लवटे #Sad_Status मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या