Nojoto: Largest Storytelling Platform

होय मी एक कलाकार... सोडून सारं घर संसार, एकटाच नि

होय मी एक कलाकार...

सोडून सारं घर संसार,
एकटाच निघालोय,
करण्या स्वप्न साकार...
होय, मी एक कलाकार......

आयुष्य नामरूपी मोहमायावी चित्रात,
काव्यमयी रंग उधळु पाहणारा,
मी एक हौशी चित्रकार...
होय, मी एक कलाकार........

जीवनरूपी वाटेतील असंख्य अडचणींच्या दगडांवर,
घाव घालून उज्ज्वल यश कोरू पाहणारा;
मी एक शिल्पकार.....
होय मी एक कलाकार.....

नशिबासोबतच्या शर्यतीत हरलो शतदा,
नव्या उमेदीने होईन तयार,
पाहुनी माझा अवतार,
घ्यावी लागेल नशिबालाही माघार....
होय मी एक कलाकार.....

काय हवं असतं एका कलाकाराला?
ऐका....

प्रत्येक पायरीवर पाय ठेवताना
हवा थोडासा आधार.....
आणि "वाह क्या बात है"
इतकं ऐकून होई आनंद अपार....
होय मी एक कलाकार.....
होय मी एक कलाकार....
                                        -विशाल पंडित #होय मी एक कलाकार.....
होय मी एक कलाकार...

सोडून सारं घर संसार,
एकटाच निघालोय,
करण्या स्वप्न साकार...
होय, मी एक कलाकार......

आयुष्य नामरूपी मोहमायावी चित्रात,
काव्यमयी रंग उधळु पाहणारा,
मी एक हौशी चित्रकार...
होय, मी एक कलाकार........

जीवनरूपी वाटेतील असंख्य अडचणींच्या दगडांवर,
घाव घालून उज्ज्वल यश कोरू पाहणारा;
मी एक शिल्पकार.....
होय मी एक कलाकार.....

नशिबासोबतच्या शर्यतीत हरलो शतदा,
नव्या उमेदीने होईन तयार,
पाहुनी माझा अवतार,
घ्यावी लागेल नशिबालाही माघार....
होय मी एक कलाकार.....

काय हवं असतं एका कलाकाराला?
ऐका....

प्रत्येक पायरीवर पाय ठेवताना
हवा थोडासा आधार.....
आणि "वाह क्या बात है"
इतकं ऐकून होई आनंद अपार....
होय मी एक कलाकार.....
होय मी एक कलाकार....
                                        -विशाल पंडित #होय मी एक कलाकार.....