Nojoto: Largest Storytelling Platform
vishalpandit7662
  • 29Stories
  • 20Followers
  • 234Love
    397Views

VISHAL PANDIT

मी कवी नाही.....

  • Popular
  • Latest
  • Video
c3709f349480bca3c969d45cb1183d63

VISHAL PANDIT

67 Views

c3709f349480bca3c969d45cb1183d63

VISHAL PANDIT

कहानी... 

#CapableEnough

कहानी... #CapableEnough

36 Views

c3709f349480bca3c969d45cb1183d63

VISHAL PANDIT

*गहिवरलेल्या मनाने मी,* 
*मग तुलाच साकडं घालतो,* 
*माणुसकी हरवलेल्या दुनियेत* 
*आता तुलाच मी आपलं मानतो..* 

*भावना जरी कणखर माझ्या*
*आसवांतून सत्य उलगडतो,* 
*श्रोता तुज बनवता बाप्पा,*
*दु:खाचा मात्र विसर पडतो...*

©VISHAL PANDIT #बाप्पा
c3709f349480bca3c969d45cb1183d63

VISHAL PANDIT

भाऊ

रक्ताच्या नात्यात 
एक नातं असंही असतं,
खरचटलं जरी एकाला
 तर दुसऱ्याला सहन होत नसतं..
लहानपणापासून एकमेकांना
जीवापाड जपलेलं असतं पण 
भाडंल्याशिवाय त्याच्याशी 
करमत सुद्धा नसतं..
आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं ||1||

प्रत्येक अडचणीत साथ खंबीर देतं
हमखासपणे एकमेकांच्या उणीवा दुर करतं
कधी देऊन मिठी प्रेमळ,
तर कधी घट्ट हात पकडुन ठेवतं
कधी रागावून तर कधी दोन मारुन समजावतं
हे असंच काहीसं चालत आलेलं असतं
आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं ||2||

काही नाती मात्र रक्ताची नसतात
वेळ पडल्यास आपल्यासाठी रक्तही सांडतात
रक्ताच्या नात्यालाही लाजवतील
 अशीच काहीशी साथ जन्मभर देऊन जातात..
चुकलं जरि कुठं तर नकळतच त्याची दुरुस्ती करून घेतात..
खरंच भावासारखे मित्र मिळणे असावे लागते नशिबात ||3||

मग कुणाच्या तरी आयुष्यात भाऊ मात्र नसतात,
साथ देण्या भावाची,बहिणीच्या स्वरुपात साक्षात भगवंतच अवतरतात..
मग कधी छळणं एकमेकांना,तर कधी चिडवणं,
कधी हसवणं,तर कधी रडवणं असंच काहिसं घडत असतं..
भावाची उणीव भरून काढण्यासाठी बहिणीचा हात मात्र पाठिवर असावा लागतं...
खरंच आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं. ||4||
                    
                                               ‌.                                -विशाल पंडित © #भाऊ....

12 Love

c3709f349480bca3c969d45cb1183d63

VISHAL PANDIT

बंधुत्व दिनविशेष....

बंधुत्व दिनविशेष.... #poem

56 Views

c3709f349480bca3c969d45cb1183d63

VISHAL PANDIT

शब्दसोबती

शब्द शब्दात शब्दांनीच
शब्दांना कसे शब्दबद्ध केले..!!
शब्दकोड्यात  छेडता सुर शब्दसंगीताचे
मज मात्र "शब्दसोबती" बनवले..!!१!!

शब्दांची किमया,शब्दांची ताकद
शब्दनाद पडता कानी,होई आनंद अमर्याद
शब्दबंधनाची मनात एक वेगळीच साद
ओढ राहावी सदैव, लुटण्या शब्ददुनियेचा स्वाद..!!२!!

शब्दसंगतीत राहता शब्दांशीच बोलणे
तृष्णा शब्दरचनेची,शब्दसाथीने शमविणे
मैत्री,प्रेम,बंधुत्व सर्वस्व शब्द समजणे
आलं आस्मानी संकट तरीही शब्दसंगती न सोडणे..
आलं आस्मानी संकट तरीही शब्दसंगती न सोडणे!!३!!

                                                          -विशाल पंडित © #शब्दसोबती...✍️✍️

8 Love

c3709f349480bca3c969d45cb1183d63

VISHAL PANDIT

कवीचे मन कसे असते?

शब्दांची ताकद एका
कवीलाच कळते..
हृदयस्पर्शी रचना
त्याच्याच मनातुन घडते..

पाहायला गेलं तर
कवी मन हळवे..
व्यक्त होता मात्र
सर्वकाही जुळवे..

शब्दरूपी धन
जणू शब्दांचा खजाना...
काव्य करता करता
विसर पडे कवीमना....

                    ‌‌-विशाल पंडित✍🏻✍🏻 कवी मना...

कवी मना...

10 Love

c3709f349480bca3c969d45cb1183d63

VISHAL PANDIT

27 Views

c3709f349480bca3c969d45cb1183d63

VISHAL PANDIT

ताण कामाचा बाळ,जरा कमीच घेत जा
मी राहील कशीही रे पण,तू मात्र वेळेवर जेवत जा ||धृ||

पोटात होतास माझ्या,तेव्हा पडला होता दुष्काळ 
खुप मेली माणसं,काही जगत होती खाऊन भातडाळ
भरघोस धान्य असुनही घरात,आता का केलास मला वजा
मी राहील रे इकडे कशीही,तू मात्र वेळेवर जेवत जा||१||

शाळेत जायला लागलास,तेव्हा वाटलं मोठा माणूस होशील 
संपतील गरिबीचे दिवस,सुखशांती घरात येईल
मोठा तर झालास पण,समजू शकला नाही माझी इजा
कसही काढीन राहिलेले दिवस इथं,पण तू वेळेवर जेवत जा||२||

हल्ली मला तुझ्या बापाची,आठवण खुप येतेय
म्हणायचा बघ आपलं पोर,आपल्याला कसं सुखात ठेवतयं
हेच सुख पाहण्यापेक्षा,बरं झालं घेतली त्यानं रजा
मी राहील कशीही रे पण,तू मात्र वेळेवर जेवत जा||३||

इच्छा होती माझी,नातवंडांसोबत खेळावं
खेळ भातुकलीचा,पुन्हा एकदा मांडावं
असा कसा माझाच खेळ भातुकलीचा,मांडलास रे राजा
सावरेल मी स्वत:ला पण,तू मात्र वेळेवर जेवत जा||४||

थकलेय आता मी,कंटाळा आलाय जीवनाचा
हातपाय पण चालत नाहीत,श्वासही गुदमरतोय माझा
भगवंता उचलत का नाहीस, सोसत नाही असली सजा
 मी आहे व्यवस्थित बाळा,तू मात्र तुझी काळजी घेत जा||४||

                                                                     -विशाल पंडित © #व्यथा_वृद्धाश्रमातल्या_आईची....
c3709f349480bca3c969d45cb1183d63

VISHAL PANDIT

पांडुरंग तो
दैवत पंढरीचे
नाम तयाचे ||१||

दु:ख या ऊरी 
आठवावी पंढरी
विठोबा तारी ||२||

संताची भेट
समाधान अफाट
बा मजलागी ||३||

तारणहार
भक्तांचा साक्षात्कार
 धाव विठोबा ||४||
    
           - विशाल पंडित © काव्यप्रकार हायकु: पंढरीचे दैवत....✍️✍️

काव्यप्रकार हायकु: पंढरीचे दैवत....✍️✍️

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile