Nojoto: Largest Storytelling Platform

तीन पटाच्या आयुष्याचा पडदा पडण्यापूर्वी जगावेस हा

तीन पटाच्या आयुष्याचा पडदा पडण्यापूर्वी
जगावेस हा जन्म रूपेरी, निघुन जाण्यापूर्वी

नको वल्गना, द्वेष कुणाचा, नकोत भलत्या इच्छा
घास सुखाचे दोन मिळावे, काय हवे आयुष्या
दुष्टताच ही नको पसरण्या अवघ्या आयुष्यावर
आयुष्याची राख माणसा होईल जळण्यापूर्वी

हातपायही गाळुन जगणे नसते जगणे काही
जन्माला ह्या आलो नुसते श्वास घ्यायचे नाही 
मेंदू वापर नाहीस फक्त मासाचा तू गोळा
जावे ठेउन ठसा आपला सरणी चढण्यापूर्वी

कर्तृत्वाचे घोट घेउनी सफल करावे जीवन
हातामध्ये नाही अपुल्या जगण्याचेही तारण
दैव, दुविधा सोडून निवडा पंचशील बुद्धाचा
चिखलामध्ये नाव जिवाची रुतून पडण्यापूर्वी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
तीन पटाच्या आयुष्याचा पडदा पडण्यापूर्वी
जगावेस हा जन्म रूपेरी, निघुन जाण्यापूर्वी

नको वल्गना, द्वेष कुणाचा, नकोत भलत्या इच्छा
घास सुखाचे दोन मिळावे, काय हवे आयुष्या
दुष्टताच ही नको पसरण्या अवघ्या आयुष्यावर
आयुष्याची राख माणसा होईल जळण्यापूर्वी

हातपायही गाळुन जगणे नसते जगणे काही
जन्माला ह्या आलो नुसते श्वास घ्यायचे नाही 
मेंदू वापर नाहीस फक्त मासाचा तू गोळा
जावे ठेउन ठसा आपला सरणी चढण्यापूर्वी

कर्तृत्वाचे घोट घेउनी सफल करावे जीवन
हातामध्ये नाही अपुल्या जगण्याचेही तारण
दैव, दुविधा सोडून निवडा पंचशील बुद्धाचा
चिखलामध्ये नाव जिवाची रुतून पडण्यापूर्वी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगणं कस असावं.... #जगणंकसअसावं हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine