Nojoto: Largest Storytelling Platform

चंद्र हरवला माझा पौर्णिमेची रात्र जरी आभाळ सारे र

चंद्र हरवला माझा

पौर्णिमेची रात्र जरी
आभाळ सारे रिते-रिते
चंद्र हरवला माझा
नजर शोधे जिथे तिथे.

पसरले आभाळभर
चांदण्यांचे कोटी कण
मनी पाझरती माझ्या
आठवांचे ओले क्षण.

धडाडली काळजात
आता विरहाची आग
पुन्हा फुलणार नाही
प्रीतफुलांची ही बाग.

सांग कशी गं काढायची
एकाकी ही चांदरात
कसे अर्ध्यावर सुटले
तुझे नि माझे हात. #चंद्र हरवला माझा
चंद्र हरवला माझा

पौर्णिमेची रात्र जरी
आभाळ सारे रिते-रिते
चंद्र हरवला माझा
नजर शोधे जिथे तिथे.

पसरले आभाळभर
चांदण्यांचे कोटी कण
मनी पाझरती माझ्या
आठवांचे ओले क्षण.

धडाडली काळजात
आता विरहाची आग
पुन्हा फुलणार नाही
प्रीतफुलांची ही बाग.

सांग कशी गं काढायची
एकाकी ही चांदरात
कसे अर्ध्यावर सुटले
तुझे नि माझे हात. #चंद्र हरवला माझा
rahuls3384301324243

Rahul S.

New Creator