Nojoto: Largest Storytelling Platform
rahuls3384301324243
  • 3Stories
  • 0Followers
  • 0Love
    0Views

Rahul S.

  • Popular
  • Latest
  • Video
3f178d5a790c3c88d0b199c853a4af05

Rahul S.

चंद्र हरवला माझा

पौर्णिमेची रात्र जरी
आभाळ सारे रिते-रिते
चंद्र हरवला माझा
नजर शोधे जिथे तिथे.

पसरले आभाळभर
चांदण्यांचे कोटी कण
मनी पाझरती माझ्या
आठवांचे ओले क्षण.

धडाडली काळजात
आता विरहाची आग
पुन्हा फुलणार नाही
प्रीतफुलांची ही बाग.

सांग कशी गं काढायची
एकाकी ही चांदरात
कसे अर्ध्यावर सुटले
तुझे नि माझे हात. #चंद्र हरवला माझा

#चंद्र हरवला माझा

0 Love

3f178d5a790c3c88d0b199c853a4af05

Rahul S.

संगीतरजनी

किशोरीच्या 'सहेला रे' चे 
पुन्हा तेच स्वर,
पुन्हा तीच रात्र
जुन्या आठवांनी
शहारते गात्र.
                'मधुकंस' सांगतो 
                विरहाचे रंग
                'यमन' मात्र 
                स्वतःमध्ये दंग.
'तिलक कामोद' चे स्वर 
रात्र करतात धुंद
तर 'दरबारी' चा आलाप
होत जातो मंद.
                'मधूवंतीने' सूरांशी
                रास खेळावा
                तसा 'अनयला' राधेचा 
                भास व्हावा.
'बसंत' छेडतो निशेला
मग 'भैरवीचे' सूर 
निजवतात वेड्या मनाला.
 #संगीतरजनी#poem
3f178d5a790c3c88d0b199c853a4af05

Rahul S.

कोमेजून जाण्याआधी फुलून यायचं होतं,
मोठं होण्याआधी लहान व्हायचं होतं
मला मोकळं व्हायचं होतं...

नाकासमोरची सरळसोट पायवाट सोडून
स्वप्नांची काटेरी वाट तुडवत विजयी व्हायचं होतं.
धावण्याआधी थांबायचं होतं
कुठला रस्ता, कुठली दिशा
सारं काही ठरवायचं होतं.
मला मोकळं व्हायचं होतं...

पानगळ होण्याआधी हिरवागार श्रावण व्हायचं होतं
तुझा हात हातात घेऊन मल्हारच्या सूरांत भिजायचं होत.
मला मोकळं व्हायचं होतं...

अखेरच्या भेटीत तुला काही सांगायचं होतं
मैत्रीचं नातं प्रीतीच्या कोंदणात सजवायचं होतं
तुझ्या-माझ्यातलं अवकाश शब्दांनी भरून काढायचं होतं.
मला मोकळं व्हायचं होतं... #collabमला मोकळं व्हायचं होतं...
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला मोकळं व्हायचं होतं...
#मलामोकळं 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

#collabमला मोकळं व्हायचं होतं... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला मोकळं व्हायचं होतं... #मलामोकळं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

0 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile