Nojoto: Largest Storytelling Platform

पुन्हा कुणीतरी वाट पहावी, पुन्हा कुणीतरी सोडून जाव

पुन्हा कुणीतरी वाट पहावी,
पुन्हा कुणीतरी सोडून जावे,
पुन्हा आपल्या अपेक्षांनी मग,
कुणाच्या तरी आसवांत न्हावे,
पुन्हा प्रेमाचे शब्द ते चार,
पुन्हा एकदा असे काहीसे घडावे,
पुन्हा विरहाची चाहूल व्हावी,
अन् पुन्हा आपण एकटे पडावे,
दरवर्षी सारखे, वर्षांवर वर्ष उलटून जाते,
तरी प्रत्येक वर्षी, काहीतरी आत सलत राहते,
मरगळ झटकतो सरत्या वर्षाची, नि उठतो,
हसऱ्या चेहऱ्याने मग, नव्या वर्षाची वाट बघतो,
पुन्हा होतो सज्ज, आयुष्य माझं जगायला,
पुन्हा येणाऱ्या वर्षात, स्वतःला नव्याने बघायला,
हे वर्ष माझं असेल, हे मी मलाच ठणकावून सांगतो,
माझं कुणीतरी असेल, हे पुन्हा या वर्षी मागतो...
#पुन्हा_नवीन_वर्ष #२०२२
स्वप्नील हुद्दार

©Swapnil Huddar #HappyNewYear