जस जश्या बदलत आहेत तारखा आणि पलटतायेत कॅलेंडरची पानं तसं तशी पडतायेत पावलं दूर दूर एकमेकांपासून तो बिंदू आहे तसाच आहे स्थिर स्थितप्रज्ञ ...घडून गेलेला आणि मी मात्र घरंगळत गतिमान ....दूर फेकली जात आहे तो एक क्षण तिथेच आहे का? की मी ही तिथं पर्यंत पोहचत आहे. अगदी वेगाने अगदी जिवाच्या अकांताने... समजत नाही हे वर्तुळ आहे का? सोडून गेलेल्या बिंदूपासून ....बिंदूपर्यंत पोहचण्याचे वर्तुळ ....वसुंधरा जाधव #वर्तुळ#आयुष्य#एकटेच#एकाकी#वसुंधरा जाधव# #leftalone