Nojoto: Largest Storytelling Platform

White मेहनत जास्त करून,थोडेसे कमी गुण मिळाले म्हणू

White मेहनत जास्त करून,थोडेसे कमी गुण मिळाले म्हणून, 
नशिबाला दोष देतोस की काय?
केली होतीस तू जीवाची काया,
म्हणून तू अपयशी झालास  काय ?

बोलतील तुलाही वेड्या आता काहीजण टोचून,
 ते मनामध्ये ठेवायचं नाही,
आयुष्याच्या एका प्रवासाने
खचून जायचं नाही,

ठेव थोडा मनामध्ये धीर,
 यातूनही तू बाहेर येशील, 
पुढच्या वेळेला तू तुझ्या यशाने उत्तर देशील,

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, 
तुझ्या कुटुंबाचा आधार,

                ♥️कवी मन झाले, शब्दातून शब्द आठवले...♥️

©sachin sukam
  #Free poem