White #नात्यास नाव अपुल्या.... शब्दवेडा किशोर तुला विसरावं एवढं हलकं नातं नाही सखे आपलं अनादि अनंत काळासाठी ते मी माझ्या अंत:करणी आहे जपलं प्रत्यक्षात जगलेल्या साऱ्या क्षणांना आठवणींच्या कुपित जतन केलं स्वप्नातल्या भेटी असल्या तरी त्यात तु कायमच माझ्या मनाला होतं स्पर्शीलं आयुष्यात पहिल्यांदा स्वतःचं पूर्णत्व मी मनसोक्त होतं अनुभवलं मग कसं विसरता येईल सांग बरं ज्या अनमोल क्षणांना ज्यांना मी मनभरून होतं जगलं नव्हतं माहित मला कुणासाठी लिहायची तू तुटक्या शब्दांची कविता पण मी मनापासून जगल्या आहेत त्या साऱ्या तुझ्या शब्दसरिता जुळलं नातं तेव्हा जरासं तुझ्या भावनांशी जरासंही चुकलो नव्हतो मी तेव्हा खेळून स्वतःच्याच मनीच्या स्पंदनांशी आठवताच मज हे सारं मन माझं गलबलतं स्वतःच्या त्या तेजमय जगण्यावर आपसूक हसू येतं एकदा हरलो असेन प्रेमात जरी तरी प्रेम माझं खरं आहे अन् होतं मनापासून सखे तुला मी वरलं होतं माझ्याशी दिलेल्या वचनाला तुझ्या लेखी काय किंमत माहिती नाही काय सांगावं माझ्या अस्तित्वाचे रंग तुझ्यात उमठत नसतील पण माझ्या लेखी तुझी वचने कायम ब्रह्मवाक्य होती आहेत अन् कायमच असतील पुन्हा एकदा सांगतो सखे तुला विसरावं एवढं हलकं नातं नाही सखे आपलं अनादि अनंत काळासाठी अंत:करणी आहे जपलं ©शब्दवेडा किशोर #नातं_तुझं_नी_माझं