Nojoto: Largest Storytelling Platform

ही व्यथा कोणती तुझ्या मनाला छळते वेदना मनी का पुन्

ही व्यथा कोणती तुझ्या मनाला छळते
वेदना मनी का पुन्हा पुन्हा ही जळते

ना कधी सांगशी स्वतःहून कोणाला
लपवून ठेवले अंतरात दुःखाला 
तुज पुसता कोणी हसत टाळशी त्याला
पण एकांती तव नयनांतुन जी झरते

दुःखास आत कोंडून किती ठेवावे
जे असे मनी बोलून मोकळे व्हावे
कोणास तरी मन उलगडून दावावे
बोलता कुणाशी दुःख मनीचे सरते

हा बंध कोणता ठाउक मजला नाही 
या जन्मीचा की गत जन्मीचा काही 
फारसे जरी ना सांगतेस तू काही
पण कधी मला ना सांगताच तू कळते

पुसतेस मला तू‌ सांगशील का मजला
हे भाव मनीचे कसे समजती तुजला 
सांगतो खरे हा प्रश्न मलाही पडला 
हे बंध मनाचे असेच उत्तर मिळते

©जितू
  #Fire
jitendriyaoka1434

जितू

New Creator

#Fire #Poetry

126 Views