White #माझी रखुमाई.... शब्दवेडा किशोर फुल मी एक सुकुमार तर तु माझी पाकळी झाली भावनांचा निराळा पूल मी तर तु माझी सरिता झाली एक सुकुमार सतेज देह मी तर तु माझा श्वास झाली नव्या स्वप्नांची रास मी तर तु माझ्या जगण्याचा ध्यास झाली एक पांथस्थ वाटसरू मी तर तु माझा सुर्य झाली जीवनवारीचा वारकरी मी तर तु माझी रखुमाई झाली ©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून