जीवनाचे कोडे सुटता सुटत नाही..... By Dharmendra Gopatwar जीवनाचे कोडे सुटता सुटत नाही माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही ..., आतून पोखरलेली मने त्यांची , चेहऱ्यावर मुखवटे घालून फिरतात दिसेल कुणी आपले की चेहरा मागे फेरतात .... स्वार्थाचा बाजार आहे सगळा नात्याला पैशाने तोलतात .... हृदय शून्य झाला आहे मनुष्य इथे.... नुसता शरीर घेऊन फिरतोय ..... ईश्वराला मानत नाही माणसाला जाणत नाही , राक्षसी वृत्ती काही केल्या मिटत नाही .... दुखावलेल्या माणसाला इथे दिलासा कुणी देत नाही.... तड-फडत्या माणसाला बघून कुणाच्या अश्रू डोळ्यांत येत नाही...., पाय कुणाच्या मदतीला धावत नाही तुटलेल्या माणसाच्या पाठीवर हात कुणी फेरत नाही.... डोळे वाईट बघण्यास अतुरलेले असतात , चुकी नाही माणसांची , काळ बदलला आहे , कोण कुठे कधी बदलतो याचा काही नेम नाही काही लोक बोलून दाखवितात..... , तर काही मुकाट्याने खूप काही शिकवून जातात माणसातला माणूस मेलाय याची जाणीव करून देतात.... अक्षरशः माणसातला माणूस मेलाय याची जाणीव करून देतात... माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही ....... कोडे जीवनाचे सुटता सुटत नाही....... YT/कवी_मन (मनातलं ओझं पानावर) Author ©Dharmendra Gopatwar #जीवनाचे कोडे